मनोरंजन

महेश कोठारेंनी मागितली जाहीर माफी

प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे महेश कोठारे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली.

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' Sukh Mhanje Nakki Kay Asta या मालिकेच्या १४ सप्टेंबरच्या एपिसोडवर प्रेक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या एपिसोडमध्ये दाखवलेल्या एका दृश्याबाबत प्रेक्षकांनी आक्षेप घेतला असून आता त्याबद्दल निर्माते महेश कोठारे Mahesh Kothare यांनी जाहीर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे.

नेमकं काय चुकलं?

या मालिकेत सँडी विश्वास नावाच्या पात्राच्या ब्लाऊजवर वंदनीय गौतम बुद्धांचा फोटो होता. यामुळे भावना दुखावल्या गेल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं. अनेकांनी या मालिकेवर टीका करण्यास सुरुवात केली.

महेश कोठारेंची माफी

मालिकेच्या संपूर्ण टीमच्या वतीने महेश कोठारे यांनी प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, "या मालिकेच्या १४ सप्टेंबरच्या भागात आमच्या एका पात्राच्या (सँडी विश्वास) ब्लाऊजवर वंदनीय बुद्ध यांचं चित्र होतं. या घटनेमुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी आपणास विश्वास देऊ इच्छितो की, आम्हा सर्वांना गौतम बुद्धांविषयी खूप आदर आहे. ही चूक कोणीही जाणूनबुजून केली नाही, याची मी खात्री देतो. पण या चुकीसाठी मी तुम्हा सर्वांची जाहीर माफी मागतो, अगदी मनापासून माफी मागतो. आपणसुद्धा मला क्षमाशीलता दाखवाल अशी मी आशा करतो. त्याचप्रमाणे भविष्यात ही चूक पुन्हा घडणार नाही याचं आश्वासन मी देतो."

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत जयदीप आणि गौरी यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यात मुख्य भूमिका साकारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Dham Temple Tragedy : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू; गर्दीत विजेची तार पडली अ्न...

Jaggery Industry Law: गूळ उद्योगासाठी आता स्वतंत्र कायदा; साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठविणार

Nashik Sisters Drown : आई लगेच येईल, सांगून डॉक्टर बाबा दवाखान्यात गेले; 2 चिमुकल्या मुलींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : जोतिबा डोंगरावर आज श्रावणषष्ठी यात्रा; महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून तीन ते चार लाख भाविक येणार

Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

SCROLL FOR NEXT