Mahesh Manjrekar  Instagram
मनोरंजन

"आम्ही प्रत्येकाचं मन राखू शकत नाही"; तक्रारीवर महेश मांजरेकर यांची रोखठोक भूमिका

'नाय वरनभात लोन्चा..' चित्रपटाचा वाद

स्वाती वेमूल

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटावरील वाद अद्यापही सुरू आहे. या चित्रपटात मुलं आणि महिलांचं आक्षेपार्ह चित्रण केल्याच्या आरोपाखाली मांजरेकरांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीवर मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ज्यांना ज्यांना आक्षेप आहे त्या प्रत्येकाचं मन मी राखू शकत नाही", असं त्यांनी म्हटलंय. क्षत्रिय मराठा सेवा संस्थेनं वांद्रे इथल्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार दाखल करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. या तक्रारीत मांजरेकरांसोबतच नरेंद्र, श्रेयस हिरावत आणि एनएच स्टुडिओ या निर्मात्यांचाही उल्लेख आहे. मांजरेकरांच्या या चित्रपटात महिला आणि मुलांचं अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने चित्रण केल्याचं वकील डी. व्ही. सरोज यांनी तक्रारीत म्हटलं. १४ जानेवारी रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

'न्यूज १८ डॉटकॉम'शी बोलताना मांजरेकर म्हणाले, "मी अशा तक्रारींकडे लक्ष देत नाही. आज प्रत्येकाला प्रत्येक चित्रपटात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना आक्षेप आहे त्या प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही. निर्माते कायदेशीर मत घेऊन प्रतिसाद देतील."

त्यांनी आधीच सीबीएफसी प्रमाणपत्र घेतलं असल्याने अशा तक्रारींचा अर्थ नाही, असंदेखील मांजरेकरांनी स्पष्ट केलं. "आम्ही हा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला दाखवला. त्यांनी आमच्या चित्रपटाला 'अ' प्रमाणपत्र दिलं. आमचा चित्रपट प्रौढ प्रेक्षकांसाठी आहे हे आम्हाला माहीत असल्याने आम्ही ते मान्य केलं. त्यामुळे कोणते प्रेक्षक ते पाहू शकतात हे मी ठरवलं नाही. मला वाटतं की कायदेशीर पद्धतीने योग्य ते झालं पाहिजे", असं ते पुढे म्हणाले.

चित्रपटातील बोल्ड दृश्यांच्या आरोपांवर मांजरेकर म्हणाले, 'मी कधीही लोकांचं लक्ष वेधण्यासाठी असा प्रयत्न केला नाही. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असं केलं नाही. आतापर्यंत मी २५ हून अधिक चित्रपट केले आहेत, मग आताच मला असं काही करायची का गरज भासेल? मला खूप वर्षांपूर्वी ही कथा आवडली होती. एका पत्रकाराने लिहिलेली ही कथा आहे आणि मला वाटलं की त्यावर चित्रपट बनवावा.'

या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्याकाळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळे पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'मध्ये दाखवण्यात आलं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शनाआधी सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवरून विविध स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT