Mahesh Manjrekar Upcoming Movie Sakal
मनोरंजन

Juna Furniture : महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट

निर्माते , दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Juna Furniture : आता ते आणखीन एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘जुनं फर्निचर’ असे त्या चित्रपटाचे नाव असून सत्य-सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शन सोहळा नुकताच दादर-शिवाजी पार्क येथे पार पडला.

सलीम खान यांच्या हस्ते हा टीझर प्रदर्शित करण्यात आला.यावेळी राजकीय मंडळींबरोबरच महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर अशी चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होते.

यादरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला. यतीन जाधव यांची निर्मिती असलेला हा चित्रपट महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत. हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांचेच आहेत.

तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्क व्यक्ती म्हणजे ‘ओल्ड फर्निचर’ वाटतात; परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, ‘‘हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत.

त्यापैकीच हा ‘ओल्ड फर्निचर’ म्हणजेच ‘जुनं फर्निचर’. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली ‘जुनं फर्निचर’ म्‍हटले जाते; परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT