Satya Manjrekar movie  esakal
मनोरंजन

Mahesh Manjrekar: मांजरेकरांचा मावळा 'सत्या' का होतोय ट्रोल?

ऐतिहासिक चित्रपट करताना भान ठेवण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी यावेळी निर्माते आणि दिग्दर्शक केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Movie Controversy: मराठी चित्रपट विश्वामध्ये वेगवेगळ्या कारणावरुन खळबळ उडालेली दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आणि घटनांवर आधारित चित्रपटांचा ट्रेंड चर्चेत आला आहे. मात्र सुबोध भावे यांच्या हर हर महादेव चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची चर्चाही आहे. काल संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर टीका केली होती.

ऐतिहासिक चित्रपटांची सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली मोडतोड केली जाते. वाट्टेल ते दाखवण्याचा अट्टाहास केला जातो. त्यामुळे मात्र इतिहासच बदलून सादर केला जातो. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करत असताना योग्य त्या पद्धतीनं सादरीकरण केले गेले पाहिजे. अन्यथा आक्रमक रुप धारण करावे लागेल. असा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता. हे सगळं होत असताना राजेंनी सध्या चर्चेत असलेल्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावरही टीका केली आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. याशिवाय त्याच्या मुहूर्त सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोठा वाद सुरु झाला आहे. संभाजी राजे यांनी तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ऐतिहासिक चित्रपट तयार करताना काय काळजी घ्यावी याविषयी सांगितले आहे.

सुरुवातीला संभाजीराजे यांनी वेडात मराठे वीर दौडले सात मधील कलाकार आणि त्या कलाकारांची वेशभूषा याकडे लक्ष वेधले. कोणत्यावेळी काय वेशभूषा असावी याचे भान ठेवायला हवे. यावेळी त्यांनी मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याच्यावरही टीका केली आहे. त्याचा फोटो सादर करत त्यांनी मावळा असा दिसतो का असे म्हणून त्याच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्या हा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतो आहे. अनेकांनी त्याच्या दिसण्यावर आणि वेशभूषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ऐतिहासिक चित्रपट करताना भान ठेवण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी यावेळी निर्माते आणि दिग्दर्शक केले आहे. आता संभाजी ब्रिगेडनं मांजरेकर यांच्या वेडात मराठे चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मांजरेकर यांच्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार करणार असून सोशल मीडियावर त्याच्या भूमिकेबाबत देखील अनेकांनी वेगवेगळया प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT