Mahesh Manjrekar will not going to direct SwatantraVeer Sawarkar...read new updates Instagram
मनोरंजन

'स्वातंत्र्यवीर सावरकर' मधून मांजरेकरांचा काढता पाय, दिग्दर्शनासाठी नवीन नाव चर्चेत

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या बायोपीकचं शूटिंग पुढील आठवड्यापासून सुरु होणार होतं पण आता मांजरेकरांच्या एक्झिटमुळे चित्रिकरण लांबणीवर पडणार असं बोललं जातंय.

प्रणाली मोरे

Swatantraveer Sawarkar Biopic: महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि रणदीप हुड्डा (Randeep Hooda)अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अर्थात सिनेमा सावरकरांवर आहे, हा सिनेमा चर्चेत येण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा असला तरी त्याचं दिग्दर्शन मराठीतले फायरमॅन महेश मांजरेकर करणार यामुळे देखील अनेकांचा सिनेमाप्रतीचा इंट्रेस्ट वाढला होता. त्यात रणदीप हुड्डानं सिनेमात सावरकरांच्या भूमिकेत फीट दिसण्यासाठी कमी केलेलं वजन याचा देखील गेल्या काही दिवसांत मोठा बोलबाला झाला होता. (Mahesh Manjrekar will not going to direct SwatantraVeer Sawarkar...read new updates

पण आता सिनेमा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. यामुळे मांजरेकरांच्या चाहत्यांचे मन मात्र दुखावणार आहे. कारण एका मीडिया वृत्तानुसार म्हणे मांजरेकरांनी आता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातून काढता पाय घेतला आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेतून महेश मांजरेकर बाहेर पडले असून आता रणदीप हुड्डा सिनेमाचा मुख्य अभिनेता साकारण्यासोबतच सिनेमाच्या दिग्दर्शकाची महत्त्वाची भूमिकाही बजावणार असल्याचं बोललं जात आहे.

अद्याप मांजरेकर किंवा रणदीप हुड्डा दोघांनीही याबाबतीत स्पष्टिकरण दिलं नसलं तरी आता सिनेमाचा दिग्दर्शक बदलला अशी चर्चा मात्र जोरात सुरू झालीय. सिनेमाचं चित्रिकरण पुढील आठवड्यात सुरू होणार होतं पण आता ऐनवेळी मांजरेकरांची सिनेमातून एक्झिट झाल्यानं कदाचित हे चित्रिकरण पुढे ढकललं जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे.

सिनेमाला काहींचा विरोध होताना दिसला होता त्यामुळे मांजरेकरांनी सिनेमातून बाहेर पडण्याचं ठरवलं असं देखील कानावर पडत आहे. पण आता खरंच हे कारण आहे की काही तांत्रिक कारणं हे अद्याप ठोस कळू शकलेलं नाही. सध्या तरी रणदीप हुड्डा सिनेमाचा नवा दिग्दर्शक म्हणून घोषित केला जाईल अशी वातावरण निर्मिती झालेली दिसून येत आहे.

यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं २८ मे रोजी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरची खूप चर्चा झाली त्याबरोबर रणदीप हुड्डाचं झालेलं ट्रान्सफॉर्मेशनही लोकांना खूप आवडलं. रणदीपनं तब्बल २५ किलो वजन या भूमिकेसाठी कमी केलं आहे. सध्या मांजरेकर 'बिग बॉस मराठी ४' च्या तयारीत व्यस्त आहे. २ ऑक्टोबर पासून तो शो देखील सुरू होत आहे. त्यात 'गोडसे' सिनेमावर देखील ते काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather forecas : महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार, कोकणपासून विदर्भापर्यंत आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Chia Pudding Recipe: नो शुगर, नो गिल्ट! ब्रेकफास्टला बनवा टेस्टी अन् तितकाच हेल्दी 'तिरामिसू चिया पुडिंग'; पाहा भन्नाट रेसिपी...

आजचे राशिभविष्य - १२ नोव्हेंबर २०२६

आजचे पंचांग आणि दिनविशेष - १२ नोव्हेंबर २०२६

Abhishek Sharma: "ओह माय गॉड, अभिषेक!" स्टार क्रिकेटपटूची शाळेतल्या शिक्षिकेला दिवाळीत सरप्राईज भेट; Viral Video

SCROLL FOR NEXT