Mahhi Vij brother 
मनोरंजन

सोनू सूदकडून मदत मिळाल्यानंतरही नाही वाचले माहीच्या भावाचे प्राण

माही विजच्या २५ वर्षीय भावाचं कोरोनाने निधन

स्वाती वेमूल

टेलिव्हिजन अभिनेत्री माही विजच्या Mahhi Vij भावाचं कोरोनाने निधन झालं. माहीने सोशल मीडियावर तिच्या भावाचा फोटो पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं. अभिनेता सोनू सूदने Sonu Sood माहीच्या भावाला रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी मदत केली होती. तिने सोनूचेही आभार मानले. 'परिस्थितीला सामोरं जायचं धैर्य जेव्हा माझ्यात नव्हतं, तेव्हा तू मला आशेचा किरण दाखवलास. सत्याशी कुठेतरी झगडत असताना माझा भाऊ घरी परतेल असं मला वाटत होतं. पण तू केलेल्या मदतीसाठी मी तुझे आभार मानते. हजारो, लाखो गरजू लोकांची मदत तू करतोयस, तुझ्या धैर्याला सलाम', अशा शब्दांत माहीने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. (Mahhi Vij loses her brother to Covid 19 says thanks to Sonu Sood for finding a hospital bed)

माहीच्या भावासाठी सोनू सूदनेही ट्विट केलं होतं. 'ज्या २५ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, त्याचा कोरोना विरोधातील लढा अयशस्वी ठरला. त्याची जगण्याची शक्यता फार कमी होती हे माहित असतानाही मी रोज आशेने डॉक्टरांशी बोलत होतो. त्याच्या पालकांना सत्य सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं', असं सोनू सूदने ट्विट करत लिहिलं होतं.

किश्वर मर्चंट, सुयश राय, रिधी डोग्रा, युविका चौधरी, कांची कौल यांसारख्या इतर सेलिब्रिटींनी माहीला धीर देण्याचा प्रयत्न केला. माहीने 'कैसी लागी लगन', 'लागी तुझसे लगन', 'लाल इश्क' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही ती झळकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी! कॅबिनेट बैठकीत निर्णय; निवडणुकीबाबतही मोठं पाऊल

Sahyadri Trekkers : सह्याद्रीतील लिंगाणा सुळक्यावर ३२ जणांची साहसपूर्ण चढाई; आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात साजरा!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आणि अजित पवार लवकरच एका मंचावर दिसणार

Mohol News : मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहोळच्या तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे सन्मानित; शहर विकासासाठी निधीची ग्वाही!

Navi Mumbai: नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट, प्रवाशांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT