main atal hoon movie release date revealed pankaj tripathi ravi jadhav Esakal
मनोरंजन

Main Atal Hoon: पंकज त्रिपाठींच्या 'मै अटल हू' ची पहिली झलक, या तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

मै अटल हू सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीय

Devendra Jadhav

Main Atal Hoon: गेल्या अनेक महिन्यांपासुन रवी जाधवच्या आगामी हिंदी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. हा सिनेमा म्हणजे 'मै अटल हू'. हा सिनेमा अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.

पंकज त्रिपाठी सिनेमात वाजपेयींची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचा फर्स्ट लूक भेटीला आलाय. यामध्ये अटलजींच्या आयुष्यातले विविध पैलू दिसणार आहेत.

(main atal hoon movie release date)

मै अटल हू सिनेमाचा पहिला लूक समोर

रवी जाधव यांनी सोशल मीडियावर 'मै अटल हू' सिनेमाची पहिली झलक समोर आणलीय. रवी जाधव यांनी सिनेमाचे पोस्टर शेअर करत वाजपेयींच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडले आहेत.

एक असा कवी ज्याने इतिहास रचला.. जिगर सोने का इरादे फौलादी.. अशा टॅगलाईन वापरत 'मै अटल हू' सिनेमाचे विविध पोस्टर शेअर करत आहेत. प्रत्येक पोस्टरवर पंकज त्रिपाठींच्या प्रगल्भ अभिनयाची झलक पाहायला मिळते.

या तारखेला 'मै अटल हू' येणार सिनेमागृहात

काही दिवसांपुर्वी मनोज वाजपेयींचा 'सिर्फ एक बंदा काफी है' सिनेमावर कौतुकाचा वर्षाव झाला.या बायोपीकची निर्मिती विनोद भानुशाली यांनी केली होती.

'मैं अटल हूं' सिनेमाच्या निमित्ताने विनोद पुन्हा एकदा निर्मितीची धूरा सांभाळणार आहेत. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट पुढील वर्षी १९ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

'मै अटल हू' सिनेमाची उत्सुकता शिगेला

'मै अटल हू' या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करत आहेत तर लॉरेन्स डी कुन्हा सिनेमॅटोग्राफी करत आहेत. 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे.

'बालगंधर्व' या मराठी सिनेमानंतर १२ वर्षांनी रवी जाधव पुन्हा एकदा बायोपीकचं दिग्दर्शन करत आहेत. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT