main atal hoon movie teaser starring pankaj tripathi directed by ravi jadhav SAKAL
मनोरंजन

Main Atal Hoon Teaser: 'दलदलीतून कमळ नक्की उगवेल', पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हू' चा टीझर बघाच

'मैं अटल हू' सिनेमाचा भन्नाट टीझर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Main Atal Hoon Teaser News: पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेला 'मैं अटल हू' सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. 'नटरंग' फेम मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळत आहेत.

अशातच मैं अटल हू सिनेमाचा टीझर आज भेटीला आलाय. काहीच मिनिटांच्या या टीझरमधून अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठींच्या भन्नाट अभिनयाची झलक पाहायला मिळते.

गेल्या काही दिवसांमधील प्रभावी मोशन पोस्टरनंतर निर्मात्यांनी आज श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनाची झलक दाखवणारा चित्रपटाचा टीझर लॉंच केलाय.

या टीझरमध्ये अस्वस्थ असणारे वाजपेयी ठाम निश्चय करताना दिसत आहेत. "दलदलीतून कमळ उगवेल", अशा शब्दात ते निर्धार करताना दिसत आहेत. या छोट्याश्या टीझरमधून पंकज त्रिपाठींनी वाजपेयींचं व्यक्तिमत्व किती आत्मसात केलंय, याची जाणीव होते.

उद्या पंकज त्रिपाठी स्टारर, 'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च होणार आहे. या ट्रेलर लॉंचला सिनेमातले प्रमुख कलाकार, दिग्दर्शक रवी जाधव आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित राहतील.

रवी जाधव दिग्दर्शित, ऋषी विरमणी आणि रवी जाधव लिखित, भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रस्तुत 'मैं अटल हूं' हा सिनेमा विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली निर्मित आहेत. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT