Main Atal Hoon Pankaj Tripathi Bollywood Actor interview esakal
मनोरंजन

Pankaj Tripathi : सध्याचे राजकारणी अन् अटल बिहारी वाजपेयी यांच्यात खूपच अंतर! ते तर...पंकज त्रिपाठीला काय म्हणायचंय?

प्रसिद्ध दिगर्शक रवी जाधव यांच्या मैं अटल हू ची सगळीकडे चर्चा आहे. येत्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युगंधर ताजणे

Main Atal Hoon Pankaj Tripathi Bollywood Actor interview : प्रसिद्ध दिगर्शक रवी जाधव यांच्या मैं अटल हू ची सगळीकडे चर्चा आहे. येत्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मैं अटल हू ने प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्यामध्ये पंकज त्रिपाठीनं मुख्य भूमिका साकारली आहे.

पंकज आणि रवी जाधव यांच्या मैं अटल हू चे जोरदार प्रमोशन सुरु झाले आहे. काही दिवसांपासून त्याच्या व्हायरल झालेल्या टीझर आणि ट्रेलरची चर्चा रंगली आहे. त्यातील गाण्यांची चर्चा आहे. पंकजनं या चित्रपटातून भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. या सगळ्यात पंकजनं काही मुलाखतींमधून आगामी काळातील त्याच्या प्लॅनविषयी सांगितलं आहे.

सतत २० वर्षे आपण अविरत संघर्ष करतो आहोत. या सगळ्यात आपल्याला विश्रांती नाही. आठ तास आपल्याला विश्रांतीची गरज आहे. मात्र ती काही मिळत नाही. त्यामुळे या प्रोजेक्टनंतर मी गांभीर्यानं ब्रेकचा विचार करणार असल्याचे पंकजचे म्हणणे आहे. या सगळ्यात आता पुन्हा एकदा पंकजची एक मुलाखत समोर आली आहे. त्यात त्यानं देशाच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआयशी बोलताना पंकजनं दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे. तो त्यामध्ये म्हणतो की, अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व काही औरच होते. त्यांची तुलना ही सध्याच्या राजकारण्यांशी होऊ शकत नाही.ते कवी मनाचे होते. त्यांनी आपल्या नेतृत्वाची वेगळीच छाप उमटवली होती. विरोधीपक्षातील नेते देखील त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करायचे. असा त्यांचा दरारा होता. असे पंकजनं म्हटले आहे.

पंकजच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याला कोणत्या अँगलनं बोलायचे आहे असे प्रश्न आता नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी देखील पंकजनं त्याला या चित्रपटाविषयी कोणत्या संघर्ष आणि आव्हानांचा सामना करावा लागला याबद्दल सांगितले होते.

रवी जाधव दिग्दर्शित मैं अटल हू हा चित्रपट १९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या टीझर, गाण्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पंकजनं पहिल्यांदाच एका बायोपिकमध्ये काम केल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT