Pankaj Tripathi who is talking about main Atal hoon easkal
मनोरंजन

Main Atal Hoon: 'तुम्ही प्रत्येक गोष्ट जर निवडणूकीशी जोडणार असाल तर कसं होणार?' पंकज त्रिपाठीनं सुनावलं!

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'मैं अटल हू', हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. येत्या १९ जानेवारी रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

युगंधर ताजणे

Pankaj Tripathi who is talking about main Atal hoon : प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा मैं अटल हू, हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. येत्या १९ जानेवारी रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे सुरु असणारे प्रमोशन यामुळे वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. दिग्गज अभिनेता पंकज त्रिपाठीनं यात देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.

सोशल मीडियावरही मैं अटल हू चे जोरदार प्रमोशन सुरु आहे. वेगवेगळ्या मुलाखतीतून मैं अटल हू च्या प्रवासाविषयीच्या गोष्टी, किस्सेही समोर आले आहेत. अशातच आज तक ला अभिनेते पंकज त्रिपाठीनं दिलेल्या एका मुलाखतीतून मैं अटल हू विषयी व्यक्त केलेली मतं खूप काही सांगून जाणारी आहेत. पंकज काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत. Main Atal Hoon Pankaj Tripathi Movie

ऐन निवडणूकीच्या वेळेस अशा विषयाचा आणि धाटणीचा चित्रपट येणे यामागे काही खास कारण आहे का, असा प्रश्न पंकज त्रिपाठी यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. ते म्हणाले, आपल्याकडे हल्ली प्रत्येक गोष्ट ही निवडणूकीशी जोडली जाते. प्रत्येकवेळी तसे करणे महत्वाचे आहे का, याचा विचार प्रेक्षकांनी करावा असे मला वाटते.

आपण ज्यावेळी असा प्रश्न करता तेव्हा मला वाटते की, त्यामुळे तुम्ही लोकांच्या भावनांचा अनादर करता. त्यांना तुम्ही गृहित धरता. त्यांना जे वाटते ते त्यांच्या कृतीतून दिसते. त्यामुळे काय चांगले आणि काय वाईट हे त्यांना ठरवू द्या. तुम्ही पहिल्यांदा चित्रपट तर पाहा, त्यापूर्वीच आपण जे काही चर्चा करतो किंवा त्यावरुन प्रश्न उपस्थित करतो त्यामुळे मुळ विषय बाजूला राहतो.

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू आहेत. तुम्ही त्या गोष्टीकडे कोणत्या भावनेनं आणि दृष्टीनं पाहता हेही महत्वाचे आहे. पहिल्यांदा हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र व्हीएफएक्सच्या कामामुळे त्याला विलंब झाला. बाकी काही नाही. आता प्रतिक्षा सेन्सॉर बोर्डाकडून येणाऱ्या प्रमाणपत्राची आहे. असेही पंकजनं यावेळी सांगितले.

बायोपिकच्या बाबत एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची झाल्यास कोणताही दिग्दर्शक त्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या विचारधारेतून ती कलाकृती तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो विषय हा काहीवेळेला गंभीर स्वरुपाचा होतो. मेकर्स ज्या व्यक्तिमत्वावर चित्रपटाची निर्मिती करतात त्यांना त्यातून काही ना काही अपेक्षित असते. मग तो चांगला विचार असतो, ते व्यक्तिमत्व असते त्यातून प्रेक्षक त्यांना जे चांगले वाटते त्यावर प्रतिक्रिया देतात.

कोणताही चित्रपट हा वाईट किंवा चांगला नसतो. त्याचे दुसरे कारण म्हणजे संबंधित दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आणि त्याचा त्या कलाकृती मागील असणारा विचार. यामुळे जर कुणी समीक्षकाच्या भूमिकेत जात असेल तर तो त्याचा विचार आहे. आपण त्याचाही स्विकार करायला हवा. अशा शब्दांत पंकजनं त्याची भूमिका मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा फटका! स्वारगेट मेट्रो स्थानकांत गळती, प्लॅटफॉर्मवर ठेवल्या बादल्या; पाहा VIDEO

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा कहर! १० जणांना चिरडले; २ ठार, ८ जण जखमी

Latest Marathi News Update : भीषण अपघात! नवी मुंबईत भरधाव कारने १० जणांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

IND vs ENG, 3rd T20I: पाऊस करणार गेम? भारत-इंग्लंड तिसऱ्या T20I सामन्यासाठी काय सांगतो नॉटिंगहॅमचा हवामान अंदाज?

Nanded: गुंठेवारी प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार ऑनलाइन; नांदेड मनपाची डिजिटल कारभाराकडे मोठी झेप, गैरप्रकारांनाही आळा बसणार

SCROLL FOR NEXT