Main Atal Hoon Twitter Review Pankaj Tripathi Director Ravi Jadhav
Main Atal Hoon Twitter Review Pankaj Tripathi Director Ravi Jadhav esakal
मनोरंजन

Main Atal Hoon Twitter Review : सणसणीत, खणखणीत असा 'मैं अटल हू'! सर्वाधिक चर्चा कुणाची होतेय माहितीये?

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Main Atal Hoon Twitter Review Pankaj Tripathi Director Ravi Jadhav: प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मैं अटल हू (Main Atal Hoon Movie) ची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा होती. अखेर हा चित्रपट (Ravi Jadhav Director) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रवी जाधव यांनी सव्वा दोन तासांच्या मैं अटल हू मध्ये अटलजींचा (Atal Bihari Bajpayee Biopic) जो जीवन प्रवास मांडला आहे तो थक्क करणारा आहे.

मैं अटल हू मध्ये भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Bollywood New Movie Released) यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. ८० ते ९० च्या दशकांतील अनेक राजकीय घटना, त्याचा देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संस्कृतीवर झालेला परिणाम हे सारं (Bollywood News) दिग्दर्शकानं मोठ्या संयमानं मांडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चित्रपटाच्या रिव्ह्युनं त्याचे अनेक कंगोरे समोर आणले आहेत.

या सगळ्यात मैं अटल पाहून सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या नेटकऱ्यांचे (Main Atal Hoon Social Media Reaction) काय म्हणणे आहे हे आपण पाहणार आहोत. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाला अटलजींच्या आयुष्यावरील सर्वोत्कृष्ट बायोपिक असल्याचे म्हटले आहे. इतिहास, वास्तव अन् राजकीय पट हे सारं मोठ्या कमालीच्या कौशल्यानं दिग्दर्शकानं पडद्यावर साकारले आहे. अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

अटलजींच्या भूमिकेत दिसलेला पंकज यानं सगळा चित्रपट आपल्या (Pankaj Tripathi) खांद्यावर तोलून धरला आहे. त्यानं ती भूमिका साकारण्याचं जे शिवधनुष्य पेललं त्यासाठी आपण किती सक्षम होतो हे त्यानं दाखवून दिलं आहे. सध्या सगळीकडे पंकजच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. त्याचा मेकअप, त्याची देहबोली, त्याची संवादफेक हे सारं प्रभावी असून त्यातून अटलजीच आपल्याशी संवाद साधतात की काय असे वाटू लागते. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

गांधी हत्येनंतरचा प्रसंग, त्याचे देशभरामध्ये उमटलेले पडसाद यानंतर देशाचं बदलेलं राजकारण, बाबरी मशीद प्रकरण, आणीबाणीची घोषणा, हे सगळं वेगळ्या पैलुतून प्रेक्षकांसमोर आणत रवी जाधव यांनी टिपीकल पॉलिटिकल बायोपिक न करता त्यातून एक वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.त्यामुळेच की काय, मैं अटल हू हा थोडाही रटाळ अथवा कंटाळवाणा होत नाही. असेही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

यापूर्वी पंकजनं त्याच्या मुलाखतींमधून आपल्याला अटलजींची भूमिका करताना कोणत्या प्रकारची तयारी करावी लागली हे सांगितले होते. त्यात त्यांची भाषणं ऐकण्याचा सराव, त्यांचे साहित्य वाचणे आणि ज्या व्यक्तींनी अटलजींसोबत काळ व्यतीत केला आहे त्यांच्याशी संवाद साधणे हे सारं पंकजनं नेटानं केलं, त्यात तो यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मैं अटल हू खऱ्या अर्थानं पंकजच्या करिअरमधील मोठा टप्पा आहे. असं त्याच्या अभिनयाचे कौतुक करताना नेटकरी व्यक्त होत आहेत.

असा बायोपिक यापूर्वी पाहिला नव्हता. मैं अटल हू मधून खूप काही नव्यानं पाहायला मिळालं. एखादा बायोपिक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून मैं अटल हू कडे पाहावे लागेल. इतिहास अन् वास्तव यांची उत्तम सांगड घालून अटलजी हे एक नेता, कार्यकर्ता, कवी अन् माणूस म्हणून कसे होते हे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT