akshay kumar and emraan hashmi  Sakal
मनोरंजन

Main Khiladi Song Teaser: 'मुंह से सीटी और हाथ से ताली...' अक्षय कुमारने दाखवली 'मैं खिलाडी'च्या टीझरची झलक

काही दिवसांपूर्वी सेल्फी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा त्याचा नवीन चित्रपट सेल्फी घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता अक्षय कुमारने या चित्रपटाच्या पहिल्या गाणं में खिलाडीचा टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये इमरान हाश्मी त्याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. गाण्यात दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मैं खिलाडी या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तोंडाने शिट्टी वाजवायला आणि हाताने टाळ्या वाजवायला तयार रहा. हा आहे मैं खिलाडीचा टीझर. हे गाणे 1 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे'. टीझरमध्ये अक्षय कुमार चमकदार हिरव्या ब्लेझरमध्ये तर इमरान हाश्मी काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये सुंदर दिसत आहे. दोन्ही स्टार्स जबरदस्त डान्स करत आहेत.

हे गाणे मूळत: 'मैं खिलाडी तू अनारी' या चित्रपटातील असून, ते रीक्रिएट करण्यात आले आहे. सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्या 'मैं खिलाडी और तू अनारी' या चित्रपटातील हे गाणे अभिजीत भट्टाचार्य, उदित नारायण आणि अनु मलिक यांनी गायले आहे. माया गोविंद यांनी लिहिले होते. 1994 साली रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 'मैं खिलाडी तू अनारी'मध्येही शिल्पा शेट्टी आणि रागेश्वरी दिसल्या होत्या.

सेल्फी या चित्रपटात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी अक्षयसोबत 'गुड न्यूज'मध्ये काम केले आहे. इमरान आणि अक्षय व्यतिरिक्त डायना पेंटी, नुरसत भरुचा हे देखील 'सेल्फी'चा एक भाग आहेत. हा मल्याळम चित्रपट ड्रायव्हिंग लायसन्सचा अधिकृत रिमेक आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा सेल्फी हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT