Main Nikla Gaddi Leke composer Uttam Singh accuses Gadar 2 makers of using work without permission  SAKAL
मनोरंजन

Gadar 2: सिनेमाने बक्कळ कमावले, पण संगीतकार उत्तम सिंग यांनी आरोप लावले, गदर 2 वादाच्या भोवऱ्यात

गदर 2 च्या मेकर्सवर गदरचे सिनेमाचे संगीतकार उत्तन सिंग यांनी खळबळजनक आरोप केलेत

Devendra Jadhav

सनी देओलच्या 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अजुनही गदर 2 बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करत आहे. गदर 2 निमित्ताने सनी देओलला सध्या अस्मान ठेंगणे झालेय. अशातच गदर 2 वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

गदर चे संगीतकार उत्तम सिंग यांनी सिनेमाच्या मेकर्सवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यामुळे गदर 2 च्या यशाला गालबोट लागलंय, असं म्हणता येईल. जाणुन घेऊया संपूर्ण प्रकरण.

(Main Nikla Gaddi Leke composer Uttam Singh accuses Gadar 2 makers of)

गदर चे संगीतकार उत्तम सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर 2' च्या टीमवर त्याचा मुख्य ट्रॅक सिक्वेलमध्ये वापरल्याबद्दल टीका केली. उत्तम यांनी चित्रपटातील 'मैं निकला गड्डी लेके' आणि 'उड जा काले कावा' ही गाणी संगीतबद्ध केली आहेत, जी संगीत दिग्दर्शक मिथुन यांनी पुन्हा तयार केली आहेत.

'अमर उजाला'ला दिलेल्या मुलाखतीत संगीतकार उत्तम सिंग म्हणाले, "गदर 2 साठी त्यांनी मला फोन केला नाही आणि मला स्वतः फोन करून काम विचारण्याची सवय नाही. माझी दोन गाणी त्यांनी चित्रपटात सर्रास वापरली आहेत. इतकंच नव्हे माझे पार्श्वसंगीतही त्यांनी वापरले असल्याचे मी ऐकले आहे. माझी गाणी चित्रपटात वापरण्याआधी एकदा तरी मला विचारून बोलण्याची पद्धत त्यांच्याकडे असली पाहिजे." अशा शब्दात उत्तम सिंग यांनी नाराजी व्यक्त केलीय

आता सनी हा साता समुद्रापलीकडे लंडनला गेला आहे. तिथंही त्यानं गदरचं प्रमोशन केलं आहे. एवढ्यावरच थांबेल तो सनी कसला त्यानं तिथल्या रस्त्यांवर भांगडा करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात कित्येक भारतीयही आनंदानं सहभागी झाले होते. ट्विटवर हे व्हिडिओ व्हायरल झाले असून सनी आणि गदर च्या टीमवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.


बॉलीवूडमध्ये ऑगस्टचा महिना फुल्ल टू गदर फिव्हरचा ठरला आहे. गदरची टीम प्रमोशनच्या निमित्तानं लंडनला गेली आहे. यावेळी सनीला पाहण्यासाठी लंडनच्या रस्त्यावर मोठी गर्दी जमल्याचे दिसून आले. लंडनमधील भारतीयांनी सनीचे मनपूर्वक स्वागत करुन त्याच्या गदर २ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सनीनं काही भारतीयांशी संवादही साधला. यावेळी सनीनं त्याची प्रतिक्रियाही दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT