virajas kulkarni  esakal
मनोरंजन

मी तीन दिवस झोपलो नाही...नुकतचं लग्न झालेल्या अभिनेत्याची पोस्ट

धनश्री ओतारी

छोट्या पडद्यावरुन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता विराजस कुलकर्णी(virajas kulkarni) नुकतचं लग्नबंधनात अडकला आहे. त्याने आपली साताजन्माची गाठ अभिनेत्री शिवानी रांगोळे ( Shivani Rangole) बांधली. सध्या तो शिवानीबरोबर क्वॉलिटी टाईम घालवत आहे. अनेक फोटो शेअर करत तो त्याच्या खासगी गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. अशातच त्याने केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

विराजसने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केली आहे. 'मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण अधून मधून उठावं लागतं'. असे त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. फ्लोरल प्रिंट असलेला शर्ट, स्पेक्ससह विराजसनं फोटो शेअर केला आहे.

त्याची ही पोस्ट पाहून चाहते अनेक तर्क वितर्क लावताना दिसत आहेत. विराजसच्या पोस्टवरही अनेकांनी कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे. 'लग्न झालं आता तुझं, आता असचं होणार'. शिवानीबरोबर क्वॉलिटी टाईम घालवत असल्यानं त्याला झोपायला मिळाली नसेल असे विविध तर्क नेटकरी लावताना दिसत आहेत.

विराजस आणि शिवानी यांनी 4 मेला लग्न केलं. लग्नाला एक महिना पूर्ण होताच त्यांनी लग्नाचा एक धम्माल व्हिडीओ शेअर केला होता. त्याचीही खूप चर्चा पाहायला मिळाली. विराजसच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर नुकताच विराजसच्या 'मिकी' या 2 अंकी विनोदी नाटकाचा प्रयोग पुण्यात पार पडला. या नाटकात विराजसनं सखाराम चव्हाण हे पात्र साकारलं आहे. तर शिवानीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं तर शिवानीची नेटफ्लिक्सवर एक नवी 'शी' नावाची एक सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT