sachin deshpande 
मनोरंजन

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील अभिनेत्याला झाली मुलगी; आगळ्यावेगळ्या बारशाची सोशल मीडियावर चर्चा 

स्वाती वेमूल

'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेत श्रेयसची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन देशपांडेच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. सध्या कोरोना महामारी आणि सरकारने आखलेले नियम लक्षात घेता या अभिनेत्याने त्याच्या मुलीच्या बारशासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. सचिन व त्याच्या पत्नीने मुलीचा बारसा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला असून त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

बारशासाठी येणाऱ्या पाहुण्यांची गर्दी होऊ नये यासाठी सचिनने घरच्या घरीच छोटेखानी कार्यक्रम आटपला आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये एक लहान बाळ म्हणताना दिसतंय की, "अनेकांना माझ्या बारशाला येण्याची इच्छा होती. परंतु, सगळ्यांना येणं शक्य झालं नाही. मी कुणावरही रागावलेली नाही." याचसोबत ते बाळ आपलं नावंही या व्हिडीओत सांगतं. माझं नाव मीरा आहे, असं ती सांगते. सचिनची ही भन्नाट कल्पना अनेकांना आवडली असून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

'सध्याच्या कोविड परिस्थतीमुळे, कुठलाही समारंभ करण्यावर अनेक बंधनं आली आहेत. पण त्याचसोबत सोहळे, समारंभ साजरा करण्याच्या नवनवीन कल्पनाही येऊ लागल्या आहेत. म्हणूनच आमच्या परीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही करत आहोत. तुम्हाला विनंती आहे की व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकीला आशीर्वादही नक्की द्या', असं सचिनने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. २४ डिसेंबर २०२० रोजी सचिन देशपांडे बाबा झाला आणि २५ फेब्रुवारी रोजी मुलीच्या बारशाचा कार्यक्रम पार पडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT