Makrand Anaspure  
मनोरंजन

Makarand Anaspure : मकरंद अनासपूरे 'एसटीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर'

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, विनोदवीर मकरंद अनासपूरे यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

युगंधर ताजणे

Makrand Anaspure now State Transport Brand Ambassador : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ही घोषणा एसटी महामंडळाच्या संदर्भात आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक नावाचा उपक्रम राबवला जात आहे. तो आणखी प्रभावीपणे राबविण्यात यावा यासाठीची ही घोषणा असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, विनोदवीर मकरंद अनासपूरे यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

मकरंद अनासपुरे यांच्या नावाची एसटी महामंडळाच्या सदिच्छादूत पदावर नियुक्ती झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. यासगळ्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या नव्या जबाबदारीप्रती आनंद व्यक्त केला आहे. एसटीच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या मला माहिती आहेत. यापूर्वी अनेकदा शुटींगच्या निमित्तानं मी एसटीमधून प्रवास केला आहे. त्यामुळे नव्या जबाबदारीची भूमिका पार पाडताना त्याचा मला उपयोग होईल.

एसटी प्रवास हा कधीही न विसरता येणारा प्रवास आहे. हे मला आवर्जून सांगायला आवडेल. त्याच्या कित्येक आठवणी आहेत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जी घोषणा करण्यात आली आहे ती समाधानकारक आणि आनंदी आहे. एसटीसाठी जे काही करता येईल ते करण्यावर आपण भर देणार असल्याचे आणि प्रयत्न करणार असल्याची भावना मकरंद यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT