Malaika Arora, Arjun Kapoor Instagram
मनोरंजन

मलायका-अर्जुनचं ब्रेकअप? फोटो पोस्ट करत दोघांनी दिलं उत्तर

मलायका आणि अर्जुन हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

स्वाती वेमूल

बॉलिवूडमधील सर्वाधित चर्चेत असलेली जोडी अर्जुन कपूर Arjun Kapoor आणि मलायका अरोरा Malaika Arora यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज नेटकरी गेल्या काही दिवसांपासून वर्तवत आहेत. ब्रेकअपच्या या चर्चांना मलायका-अर्जुनने आपल्याच अंदाजात पूर्णविराम दिला आहे. हे दोघं एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत असून इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अर्जुन आणि मलायका समुद्रकिनारी एकमेकांसोबत निवांत क्षण घालवताना दिसत आहेत. काही गैरसमजुतींमुळे अर्जुन आणि मलायका एकमेकांशी बोलत नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं या फोटोंमधून स्पष्ट होत आहे.

मलायका आणि अर्जुन हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीला दोघांनीही रिलेशनशिपबद्दल बोलणं टाळलं होतं. मात्र अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर या दोघांनीही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली. इतकंच नव्हे तर मुलाखतींमध्ये दोघांच्या त्यांच्या वयामधील अंतराबद्दलही प्रश्न विचारला असता त्याचं मोकळेपणाने त्यांनी उत्तर दिलं. त्याचप्रमाणे इतक्यात लग्नाचा विचार नसल्याचं दोघांनी स्पष्ट केलं.

एका मुलाखतीत अर्जुनला विचारण्यात आलं होतं की, 'तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तसंच घटस्फोट झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये येताना तू काय विचार केला होतास?' या प्रश्नाला अर्जुनने उत्तर दिलं, 'मी आमच्या दोघांमध्ये एक आदरयुक्त सीमा ठेवली आहे. तिला जे आवडतं ते ती करते आणि तेच मी करतो. माझ्या मलायकासोबतच्या रिलेशनशिपचा परिणाम मी कधीच करिअरवर होऊ देणार नाही. त्यामुळे करिअरसाठी मला काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मी याबद्दल आज बोलत आहे कारण मला या नात्याबद्दल आदर आहे. आम्ही एकमेकांना वेळ देत आहोत. मी मलायकाला तिच्या आयुष्यात स्पेस देतो.'

मलायका आणि अर्जुन बऱ्याचवेळा सोशल मीडियावर त्यांचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. गेल्या वर्षी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT