Malaika Arora Bollywood celebrity viral  esakal
मनोरंजन

Malaika Arora Video Viral : मलायकाच्या पायावर हे डाग कसले, तिला नक्की काय झालंय?

आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या मलायकाची बातच वेगळी आहे. काही करुन चर्चेत राहणं तिला जमले आहे.

युगंधर ताजणे

Malaika Arora Bollywood celebrity viral : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, सेलिब्रेटी आणि फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाणारी मलायका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. व्हायरल झालेल्या मलायकाच्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. मात्र या सगळ्यात मलायकाची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या मलायकाची बातच वेगळी आहे. काही करुन चर्चेत राहणं तिला जमले आहे. कधी फोटोंनी, व्हिडिओनं तर कधी काही बोलून ती चर्चेत राहते. आता तिचा एक फोटो व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या फोटोमध्ये मलायकाच्या पायावरील तो डाग दिसून आला आहे. ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे.

झोप उडवणारी टेक्नॉलॉजीच मिळवून देणार 'स्मार्ट झोप'..!!

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण....

मलायकाच्या पायावर तो डाग पाहिल्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. एकानं म्हटलं आहे की, मलायका हे काय आहे, तुला काय झाले आहे, दुसऱ्यानं म्हटले आहे की, यापूर्वी देखील हा डाग होता का, यासारख्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधून घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी मलायकाचा जन्मदिवस होता. यावेळी मलायकाला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत विश केले होते. या सगळ्यात खास गोष्ट होती ती मलायकाच्या बॉयफ्रेंडनं अर्जून कपूरनं दिलेली प्रतिक्रिया. त्यानं आपण मलायका नेहमीच तुझ्यासोबत आहोत. माझा तुला पाठींबा आहे. असे म्हणून ब्रेक अपच्या बातम्यांना पूर्णविराम दिला होता. मलायका अन् अर्जूनच्या ब्रेक अपच्या बातम्या समोर आल्या होत्या.

मलायकाच्या प्रोफेशनल लाईफविषयी बोलायचे झाल्यास तिनं यापूर्वी वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये काम केले आहे. त्यातुन ती लोकप्रिय झाली आहे. तिला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. मलायकानं जेव्हा झलक दिखला जा मध्ये जज म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना मोठा आनंद झाला होता. झलक दिखला जा च्या नव्या सीझनमध्ये देखील दिसणार आहे. अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT