Malaika Arora,Arbaaz Khan with son Arhaan Khan
Malaika Arora,Arbaaz Khan with son Arhaan Khan Google
मनोरंजन

मलायका अरोराच्या मनात भीती; मुलासंदर्भात केला मोठा खुलासा

प्रणाली मोरे

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान(Arbaaz Khan) यांनी आपला इतक्या वर्षांचा संसार मोडीत काढत २०१७ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिनं तिचा मुलगा अरहानची जबाबदारी स्वतःकडे मागून घेतली अन् अरबाजनही तिला ती सहज दिली. पण तेव्हा म्हणे खान कुटुंबियांकडून तिच्यावर भरपूर दबाव होता अशी अफवाही पसरली होती. खुलेपणानं कधीच मलायकानं यावर भाष्य केलं नसलं तरी तिनं अफवा पसरवणाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी त्यावर स्पष्ट बोलणंही टाळलं. त्यानंतर काही दिवसांतच मलायका-अर्जुन कपूरचं जुळलं आणि तिकडे अरबाजलाही गर्लफ्रेंड मिळाली. यात मुलगा अरहानची फरफट होईल असं अनेकांनी बोलून दाखवलं पण मलायकानं मात्र सिंगल मदर म्हणून स्विकारलेली जबाबदारी खूप उत्तमरित्या उचलली. मग नेमकं असं काय झालं अचानक की मलायकानं मुलगा अरहानला घेऊन मनात भीती आहे असं म्हटलंय.

तसं आपण सर्वांनीच पाहिलं असेल की भले अरबाज-मलायका विभक्त झाले असले तरी अनेकदा ते त्यांच्या मुलासोबत एकत्र डिनरला दिसतात तर कधी त्याला एअरपोर्टवर गूडबाय करण्यासाठी एकत्र येतात तर कधी त्याला एअरपोर्टवर रीसिव्ह करायला आलेले दिसतात. त्या दोघांनीही मुलासाठी आपण अशापद्धतीनं एकत्र दिसू असं मागे स्पष्ट केलं होतं. मलायका देखील मुलाची जबाबदारी पार पाडण्यात कुठलीच कसर ठेवत नाही. पण नुकत्याच एका मुलाखतीत तिनं या जबाबदारीविषयी मनात दडपण,भीती आहे याचा खुलासा केला आहे.

तिनं म्हटलं आहे,''मी अरबाजपासून विभक्त झाल्यावर अरहानची जबाबदारी 'सिंगल मदर' बनून पार पाडायचं ठरवलं. पण त्यावेळेपासून आजतागायत मनात भीती आहे,दडपण आहे. कारण अरहानला मार्गदर्शन करण्यात मी चुकले अन् तो वेगळा वागला तर बोटं माझ्यावर उठणार आहेत. मला माहित आहे मला नाव ठेवली जातील. त्यामुळे त्याला चांगलं घडवण्यात माझ्याकडून जे शक्य होईल ते मी करतेय. कारण उद्या तो एक चांगला माणूस घडला तर मी स्विकारलेली जबाबदारी मी पूर्ण केली असं सगळे म्हणतील. त्यामुळे मला कष्ट घ्यायचेत ते सिंगल मदर म्हणून यशस्वी होण्यासाठी,निव्वळ पैसा कमवत विशाल झेप घ्यायची नाही. यावेळी तिनं आपण मुलाला जीममध्ये जाण्यासोबतच योगा कर असा सल्ला आवर्जुन देतो असंही नमूद केलं. कारण योगा केल्यानं शरीरासोबतच मनाचे संस्कार जपले जातात असा माझा विश्वास आहे. आणि आता अरहानही माझ्या त्या मार्गदर्शनावर खरा उतरतोय याचा मला आनंद आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT