Malaika Arora copy uorfi Esakal
मनोरंजन

Malaika Arora copy Urfi: उर्फीचे कपडे भाड्याने घेतले की काय? मलायका ड्रेस पाहुन नेटकरी सुसाट

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री मलायका अरोराही तिच्या कामापेक्षा वैयक्तिक आयूष्यामुळं ती चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओवरुन नेटकरी तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही.

(Malaika Arora copy uorfi)

काल रात्री करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या घरी एक ग्लॅम पार्टी आयोजित करण्यात आली होती जिथे मलायकाची बहीण अमृता अरोराचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. मलायका अरोरा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत खास पार्टीत पोहोचली होती. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडची पार्टी असली तर नेटकऱ्यांचे लक्ष हे सेलिब्रिटिंच्या आउटफिटवरच असते. करीना पासून ते मलायकापर्यंत सर्वांचेच ग्लॅम आउटफिट फुल ऑन टशन करताना दिसले. मात्र यावेळी नेटकऱ्यांचं लक्ष मलायका अरोराच्या ड्रेसवरच खिललं. तिनं बोल्ड बॉडी सूट परिधान करत गुच्ची ट्राउझर्ससह तिच्या लुकला पुर्ण केला होता.

मलायकाने या ग्लॅम पार्टीत मुगलर ब्रँडचा ट्रान्सपरंट स्ट्राइप बॉडी सूट आणि गुच्ची ट्राउझर्स, बेल्ट आणि बूट घातले होते. तिने स्लीक बन हेअरस्टाइलसह आणि साधा मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला.

ती नेहमी प्रमाणे या लुकमध्ये ती हॉट दिसत होती. परंतु सोशल मीडिया यूजर्सना मलायका अरोराचा हा लूक काही खास आवडलेला दिसला नाही. तिचा हा ड्रेस विचित्र फॅशन सेन्समुळं ओळखल्या जाणाऱ्या उर्फीच्या ड्रेसशी मिळतं जुळता होता.

त्यामुळे मलायकाला पाहून ट्रोलर्सनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली. मलायका अरोराच्या या व्हिडिओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी लिहिले की, ही तर उर्फीचं वाटतेय. उर्फीची कॉपी,उर्फीची डिझाईन ,मलायकाने उर्फीचे कपडे भाड्याने घेतले आहेत. याशिवाय अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स व्हिडिओंवर नेटकऱ्यांनी दिल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT