malaika arora Sakal
मनोरंजन

Nach Baliye 10: मलायका अरोरासोबत हा दिग्दर्शक शोचा होणार जज! IBD सोडण्याचे कारण आले समोर

मलायका अरोरा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-कोरियोग्राफर आणि निर्माती फराह खान या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

स्टार प्लसच्या ब्लॉकबस्टर शो नच बलियेचा १०वा सीझन लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. या शोचा मागील सीझन खूप यशस्वी ठरला होता. प्रदीर्घ विश्रांतीनंतर लवकरच नच बलिए पुन्हा सुरू होणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, छैय्या-छैया गर्ल मलायका अरोरा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-कोरियोग्राफर आणि निर्माती फराह खान या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत.

मलायका अरोरा आणि फराह खानसोबत रेमो डिसूजाचे नावही समोर येत आहे. चॅनेल, निर्माते किंवा सेलिब्रिटींकडून याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मलायका अरोरा हिने नुकताच सोनी टीव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरचा निरोप घेतला. तिच्या जागी सोनाली बेंद्रेची निवड करण्यात आली आहे. जवळच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर मलायकाने नच बलिएमुळे IBD ला अलविदा केला आहे.

नच बलिए सीझन 9 ने केवळ छोट्या पडद्याच्या टॉप रेटिंगमध्ये स्थान मिळवले नाही तर या शोला प्रेक्षकांचे खूप प्रेम देखील मिळाले. या नृत्यावर आधारित शोमध्ये अनेक कपल्स आणि एक्स कपल्सनी सहभाग घेतला होता.

या शोच्या शेवटच्या सीझनचा निर्माता अभिनेता सलमान खान होता. याशिवाय शोमध्ये रवीना टंडन आणि अहमद खान जज म्हणून दिसले होते. शोचे स्पर्धक प्रिन्स आणि युविका सीझन 9 मध्ये जिंकले.

मलायका नच बलिए सीझन 1 आणि 2 चा भाग होती, तर फराह खानने करिश्मा कपूर आणि अर्जुन रामपाल यांच्यासोबत नच बलिए सीझन 4 आणि सीझन 7 चा जज केला आहे. नच बलिए सीझन 10 मध्ये मलायका अरोरासोबत फराहची एन्ट्री चाहत्यांसाठी खूप रोमांचक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT