मनोरंजन

मलायकाला दुसऱ्यांदा व्हायचंय आई, पण...

आपल्या हटकेपणामुळे नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी मलायका सोशल सेलिब्रेटी झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आपल्या हटकेपणामुळे नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी मलायका malaika arora ही सोशल सेलिब्रेटी झाली आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. त्यालाही प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता मलायका चर्चेत आली आहे ते तिच्या एका वेगळ्या पोस्टमुळे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या आणि अर्जुन कपूरच्या arjun kapoor नावाची चर्चा आहे. त्यांनी अद्याप लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र ते लवकरच लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यावर या दोन्ही सेलिब्रेंटीकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अभिनेत्री मलायकाची यापुढील काळात अपत्य जन्माला न घालता ते दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरुन तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट तिच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे आपण मुलगी दत्तक घ्यावी की नको याविषयी आपल्या मुलाशी म्हणजे अरहानशी चर्चाही केली आहे. तिचं म्हणणं आहे की, मला जर मुलगी असती तर मी तिला चांगल्या परिवाराशी नातं जोडून दिलं असतं. तिची उणीव मला नेहमीच जाणवते.

मलायकाचं आणि अरहानचं बाँडिंग चांगलं आहे. त्यामुळे त्यांच्यात वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होत असते. तिला आता मुलगी दत्तक घ्यायची आहे. अरहान हा अरबाज खान आणि मलायकाचा मुलगा आहे. मलायका आणि अरबाजचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मलायकाचे म्हणणे आहे की, तिच्या अनेक मित्रांनी अपत्य दत्तक घेतले आहे. मुलं ही आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येतात. मी जेव्हा अरहानशी चर्चा करते तेव्हा त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळते. त्यामुळे मला विचार करण्यासाठी योग्य दिशाही मिळत असल्याची प्रतिक्रिया मलायकानं दिली आहे.

मी अशा कुटूंबातून आले आहे ज्या कुटूंबात मुली होत्या. त्यामुळे मलाही मुलगी हवी आहे. तिची उणीव मला नेहमीच भासते. यासाठी मला आता एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. मला एक बहिणही आहे. तिच्याशीही मी अनेक गोष्टी शेयर करत असते. यावेळी तिनं अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर अरहानशीही चर्चा केली होती. असंही मलायकानं यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

Menstrual Hygiene Day 2026: मासिक पाळीत स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टिप्स

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड संशयातून प्रियकराची कपड्यांच्या दुकानात घुसून प्रेयसीला बेदम मारहाण

Sangli Accident News : सांगलीचे नायब तहसीलदार दादासो पुकळेंची डॉक्टर मुलगीचे अपघाती निधन; कोकण पयर्टन बेतलं जिवावर

SCROLL FOR NEXT