मनोरंजन

अर्जुनसोबत मलायका पर्यटनाला गेली; दिसली डायनासोरची अंडी

मलायका सध्या पर्यटनासाठी बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मालदीवला गेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मलायका सध्या पर्यटनासाठी बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मालदीवला गेली आहे. तिथे ती सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. मलायका आणि अर्जुन कपूर यांची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. मलायका तिच्या फोटोंसाठी प्रसिद्ध आहे. त्या फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. असाच एक फोटो मलायकानं शेयर केला आहे. ती मालदीवला व्हॅकेशनसाठी गेली आहे. त्यावेळी तिथे फिरताना तिला डायनासोरची अंडी दिसली असं तिनं सांगितलं आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत.

मलायकानं तिचा आणि अर्जुनचे काही फोटो शेयर केले आहेत. ते फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना समजण्यास वेळ लागला नाही की ते पर्यटनासाठी बाहेर गेले आहेत. मलायकानं इंस्टावर एक स्टोरी शेयर केली आहे. त्यामध्ये तीन मोठी अंडी दिसत आहे. तो फोटो शेयर केल्यानंतर तिनं चाहत्यांना प्रश्न विचारला आहे की, ही डायनासोरसची अंडी आहेत का? यापूर्वी तिनं सायकल चालवतानाचा व्हिडिओही शेयर केला होता. दुसरीकडे अर्जुन कपूरनं त्याच्या इंस्टा अकाउंटवरुन स्टोरी शेयर केली होती. त्यामध्ये ते एका समुद्रकिनारी बसलेले दिसत होते. त्यावरुनही चाहत्यांनी ते पर्यटनाच्या निमित्तानं बाहेर गेल्याचा अंदाज बांधला होता.

सध्या अशी चर्चा आहे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं संपुष्टात आलं आहे. आणि बऱ्याचवेळापासून त्यांच्यात कोणताही संवाद झालेला नाही. मात्र जेव्हा ते सुट्ट्यांसाठी मालदीवला गेले असल्यानं त्यांच्या त्या प्रकरणावर आता पडदा पडला आहे. अर्जुन कपूरच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, भूत पोलीसमध्ये दिसला होता. त्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद काही मिळाला नाही. मात्र त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते. तर मलायका ही इंडियाज बेस्ट डान्सरच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT