Malaika Arora on her car accident.
Malaika Arora on her car accident. Google
मनोरंजन

जीवघेण्या प्रसंगानंतर मलायकाचा खुलासा; 'माझ्यासोबत घडला तो अपघात नाही तर..'

प्रणाली मोरे

मलायका अरोरानं(Malaika Arora) तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम(Instagram)अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहीत आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नुकताच तिच्या गाडीला अपघात(Accident) झाला होता. २ एप्रिल २०२२ रोजी मुंबईनजीकच्या भागात हा अपघात झाला होता. अपघातानंतर तिला लगेचच इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. ३ एप्रिल रोजी तिला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मलायकानं पहिल्यांदाच सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

तिनं पोस्टसोबत एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती खिडकीच्या बाहेर पाहत उभी आहे. तिनं लिहीलंय,''गेल्या काही दिवसांत आणि माझ्यासोबत घडलेल्या अपघातानंतर मी इतकंच बोलते की जे काही माझ्यासोबत घडलं ते सारंच अनपेक्षित होतं. माझा अपघात तर मला वाटतंय की एखाद्या सिनेमातील सीन प्रमाणेच होता. प्रत्यक्षात अपघात घडतो तसं वाटलंच नाही मला. देवाच्या कृपेने,अपघातानंतर माझ्या मदतीला जे धावून आले ते माझ्यासाठी देवदूतांप्रमाणेच होते. ज्यांनी त्वरित माझ्या जखमांवर काळजीची मलमपट्टी केली. ज्या लोकांनी मला इस्पितळात न्यायला सहकार्य केलं ,ज्यांनी माझ्यावर उपचार केले त्या डॉक्टरांचे,परिचारिकांचे मी आभार मानते''. मलायकानं या पोस्टमध्ये आपल्या कुटुंबापासून,ओळख नसूनही मदत करणाऱ्या त्या अनोळखी माणसांपर्यंत साऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानले आहेत. ती पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणाली,''मी त्या प्रत्येकाची आभारी आहे ज्यांनी अपघात झाल्यापासून ते त्यातून बाहेर येईपर्यंत मला साहस दिलं,बळ दिलं त्या प्रसंगातून बाहेर यायचं. मी आता बरी आहे. मी एक लढवय्यी आहे. तुम्हाला कळायच्या आत मी पुन्हा नेहमीसारखीच कामाला सुरुवात करेन,सगळ्यांना उत्साही मलायका दिसेल''.

मलायकाच्या या पोस्टवर तिची मैत्रिण करिष्मा कपूरनं जोडलेल्या हातांचा इमोजी पोस्ट केला आहे. ट्विंकल खन्नाने ,'लवकर बरी हो असं लिहलंय'. ,संजय कपूरनं 'शूर मुलगी' असं कमेंटमध्ये लिहिलं आहे. तर करिना कपूरने 'स्टे स्ट्रॉंग' इमोजी पोस्ट केला आहे. २ एप्रिलला मलायकाची रेंज रोव्हर गाडी अपघातात दोन गाड्यांच्या मध्ये चेपली गेली होती. मलायाकाच्या या अपघाताची FIR नोंद झाली असून इतर दोन गाड्यांच्या मालकांशी संपर्क साधून अपघाताविषयी चौकशी होत असल्याचं म्हटलं आहे. खोपोलीच्या आसपास हा अपघात झाल्याकारणाने तिथल्या पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर हरेश कालसेकर या केसमधील चौकशीत लक्ष घालत आहेत. लवकरच यात कोणाची चुक होती हे कळेल असं पोलिस अधिकारी कालसेकर यांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT