arjun malaika instagram
मनोरंजन

अर्जुनसाठी मलायकाची खास पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने पोस्ट केला फोटो

स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज (२६ जून) त्याचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर सेलिब्रिटींकडून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र यात अभिनेत्री मलायका अरोराच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अर्जुन आणि मलायका हे एकमेकांना डेट करत असून सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करतात. आता वाढदिवसानिमित्त मलायकाने अर्जुनला मिठी मारतानाचा फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. 'हॅपी बर्थडे, माय सनशाइन' असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं असून हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. अर्जुनच्या ३४व्या वाढदिवशी या दोघांनी आपलं नातं जगजाहीर केलं होतं. त्यावेळी मलायकाने पहिल्यांदा अर्जुनसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

मलायकाने अभिनेता आणि निर्माता अरबाज खानशी लग्न केलं होतं. १९ वर्षांच्या संसारानंतर हे दोघं २०१७ मध्ये विभक्त झाले. अरबाज आणि मलायकाला अरहान हा मुलगा असून तो आता १८ वर्षांचा आहे.

'फिल्म कम्पॅनियन'ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने मलायकाला डेट करण्याबद्दल म्हटलं होतं, "मी माझ्या खासगी आयुष्याविषयी फार बोलत नाही. कारण मला माझ्या पार्टनरचा आणि तिच्या भूतकाळाचा आदर केला पाहिजे असं वाटतं. मी आदरयुक्त सीमा ठेवण्यावर विश्वास ठेवतो. ती ज्या गोष्टींबद्दल कम्फर्टेबल असते, त्याच गोष्टी मी करतो आणि या रिलेशनशिपचा माझ्या करिअरवर कोणता परिणाम होणार नाही याची काळजी घेतो."

अर्जुन 'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटात झळकला होता. अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत त्याने काम केलं होतं. मात्र या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर त्याचा 'सरदार का ग्रँडसन' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT