Malaika Arora talks about second marriage Esakal
मनोरंजन

Malaika Arora: अरबाजनंतर आता मलायकाही लागली दुसऱ्या लग्नाच्या तयारीला! व्हिडिओ व्हायरल

Malaika Arora talks about second marriage: मलायका दुसऱ्या लग्नासाठी तयार! काय म्हणाली वाचा...

Vaishali Patil

Malaika Arora talks about second marriage: अरबाज खानने 24 डिसेंबर रोजी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली. हे अरबाजचे दुसरे लग्न आहे. त्याने यापुर्वी मलायका अरोरासोबत लग्न केले होते. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. नंतर अरबाज खानने शूरासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.

सध्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे आता अरबजाजची पहिली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराही देखील लग्नासाठी तयार असल्याचे दिसत आहे. अलिकडेच स्वतः मलायकाने रिअॅलिटी शो झलक दिखला जा 11 मध्ये ती लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 2024 मध्ये ती लग्न करणार आहे.

मलायका सोनी टीव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' च्या सीझन 11 मध्ये फराह खान आणि अर्शद वारसीसोबत जज म्हणून दिसत आहे. फराह आणि मलायका अनेकदा शोदरम्यान धमाल मस्ती करताना दिसतात. तर आता या शोचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या प्रोमोमध्ये फराह खान मलायकाला विचारते, "2024 मध्ये, तू सिंगल पॅरेंट कम अभिनेत्रीपासून डबल पॅरेंट कम अभिनेत्री होशील का?" मलायका हा प्रश्न ऐकून गोंधळते आणि विचारते, “मला पुन्हा कोणाला तरी दत्तक घ्यावे लागेल का? याचा अर्थ काय?" यावर गौहर खान म्हणते , "याचा अर्थ, तू लग्न करणार आहेस का?"

तर यावर मलायका म्हणते , "जर असं कोणी असेल तर मी त्याच्याशी 100 टक्के लग्न करेन." हे ऐकल्यानंतर फराह खान आश्चर्यचकित होते आणि विचारते, "एकही नाही, अगं बरेच आहेत."

तर मलायका म्हणाली, "जर मी म्हणते की कोणीतरी आहे, याचा अर्थ कोणी लग्नासाठी विचारलं तर मी लग्न करेल."

तर फराहने पुन्हा विचारले, "कुणी विचारले तर करशील का?" यावर मलायका लगेच हो म्हणते. याबरोबरच मलायका आता पुढच्या वर्षी लग्न करण्यासाठी तयार असल्याचे संकेत तिने दिले आहेत.

मलायकाने अरबाज सोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. 11 मे 2017 रोजी दोघांनी अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केली होती. मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा मुलगा आहे. तर अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती आता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

नुकताच अर्जुन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या टॉक शोमध्ये आला होता, तेव्हा त्याने लग्नाच्या प्रश्नावर सांगितले होते की, जेव्हा आम्ही दोघे एकत्र असू तेव्हाच तो या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Bank Fraud : बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता! जुन्या नाशिकमध्ये 'आरटीजीएस' फसवणुकीचा डाव उधळला

Rohit Pawar: लोकशाहीसाठी दंडुका हाथी घेऊ, आमदार रोहित पवार यांचा इशारा

Ichalkaranji Crime : अल्पवयीन मुलाचा इचलकरंजीत वडिलांच्या मित्रावर जीवघेणा हल्ला

Nashik COVID ICU Scam : ३.३७ कोटींच्या फसवणूक प्रकरणी नाशिकमध्ये अधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार; अडचणी वाढल्या

Local Body Election: कधी लागणार आचारसंहिता? तीन टप्यात कशा होणार निवडणुका? मोठी माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT