Malaika Arora trolled for wearing balenciaga dress at manish malhotra birthday party Google
मनोरंजन

Malaika Arora: 'लाज बाळग जरा..', मलायकाच्या ड्रेसवरचे शब्द पाहून भडकले लोक...

मनिष मल्होत्राच्या पार्टीत मलायका नेहमीप्रमाणेच सिझलिंग अवतारात दिसली पण यावेळी लोकांना तिचा ड्रेस भलत्याच कारणानं खटकला आहे.

प्रणाली मोरे

Malaika Arora: बॉलीवूडची ग्लॅमरस दीवा मलायका अरोराच्या स्टाइल स्टेटमेंटसाठी आणि फॅशन सेन्ससाठी चाहते अक्षरशः दिवाने आहेत. मलायका जिथे जाते तिथे आपल्या सिझलिंग अवतारानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आपल्या आऊटफिटने लोकांना आकर्षित करून घेणाऱ्या मलायकानं आता असं काय घातलं ज्यानं सगळे तिच्यावर भडकले आहेत. नेमकं काय कारण आहे यामागे,चला जाणून घेऊया.(Malaika Arora trolled for wearing balenciaga dress at manish malhotra birthday party)

मलायका अरोरा नुकतीच फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीला हजर राहिली होती. पार्टीत मलायकानं हाय-फॅशन ब्रॅन्ड बॅलेंसिएगाचा आऊटफिट घातला होता. पण या ब्रॅन्डच्या ड्रेसमध्ये मलायकाला पाहिल्यावर लोक मात्र तिच्यावर भलतेच भडकले आहेत. याचं कारण आहे की बॅलेंसिएगाच्या एका नुकत्याच पार पडलेल्या अॅड कॅम्पेनवर लहान मुलांना सेक्सुअलाइज करण्याचा आरोप लावला गेला होता. या ब्रॅन्डच्या त्या अॅड कॅम्पेनवरनं खळबळ उडाली होती. अशामध्ये आता मलायकानं या ब्रॅन्डचा ड्रेस घातल्यामुळे नेटकरी तिला जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

मनीष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीतील मलायकाचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होताना दिसत आहेत. मलायकानं बॅलेंसिएगा ब्रॅन्डचा शॉर्ट शिमरी ड्रेस घातलेला दिसत आहे. तिनं तिच्या लूकला ब्लॅक थाय हाय बूट्स सोबत टीम अप केलं आहे. मलायकानं आपले केस मोकळे सोडले आहेत आणि काळ्या रंगाची बॅग हातात घेत आपला लूक कम्प्लीट केला आहे.

मलायका त्या व्हिडीओ आणि फोटोत नेहमीप्रमाणेच स्टनिंग दिसत आहे. पण लहान मुलांना सेक्सुअलाइज करणाऱ्या ब्रॅन्डचा ड्रेस तिनं घातलेला लोकांना मात्र मुळीच आवडलेलं नाही. लहान मुलांचे शोषण प्रमोट करणाऱ्या ब्रॅन्डला पाठिंबा दिल्यानं मलायकाला लाज वाटत नाही का असं लोक सुनावताना दिसत आहेत.

Malaika Arora trolled for wearing balenciaga dress at manish malhotra birthday party

एका नेटकऱ्यानं मलायकावर भडकत लिहिलं आहे की, 'या ब्रॅन्डवरनं एवढा मोठा वाद रंगला तरी हिनं त्यांचाच ड्रेस घातला आहे,थोडी तरी लाज बाळग'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'बॅलेंसिएगानं लहान मुलांना सेक्सुअलाइज केलं आहे,आणि तरी देखील हिनं त्यांचे कपडे घातलेत'.

माहितीसाठी इथं थोडक्यात सांगतो की हॉलीवूड अभिनेत्री किम कर्दाशिया या बॅलेंसिएगा ब्रॅन्डची ब्रॅन्ड एम्बेसडर राहिली आहे. ब्रान्डने मुलांना सेक्सुअलाइज करण्याच्या मुद्द्यावर किम देखील भडकली होती आणि ब्रॅन्डसोबतचं आपलं नात टिकवून ठेवण्यावर विचार करू असं देखील तिनं म्हटलं होतं. तर दुसरीकडे मलायका विषयी बोलायचं झालं तर ती सध्या आपला चॅट शो 'मूव्हिंग इन विथ मलायका' मुळे मोठ्या चर्चेत आहे. शो चा पहिला भाग नुकताच प्रसारित करण्यात आला. मलायकानं यात आपल्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. फराह सोबत गप्पा मारताना मलायका अनेकदा भावूक देखील झाल्याचं दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT