Innocent Actor passes away Esakal
मनोरंजन

Innocent Actor passes away: ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट यांचं निधन

इनोसेंट यांच्या निधनाने राजकीय विश्वावर आणि सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

सकाळ डिजिटल टीम

ज्येष्ठ मळ्यालम अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट यांचं मध्यरात्री उपचारा दरम्यान निधन झालं आहे. इनोसेंट यांनी वयाच्या 75 वर्षी अखेरचा श्वास घेतला. इनोसेंट यांची एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे.

रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इनोसेंट यांना कोरोना, श्वसनाचा आजार, अवयव निकामी झाल्याने हृद्याचा झटका आला आणि त्यामुळे त्याचं निधन झालं. इनोसेंट यांच्या निधनाने राजकीय विश्वावर आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

इनोसेंट यांची गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती स्थिर नव्हती. इनोसेंट यांना आधी कॅन्सर झाला होता. मात्र त्यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र श्वसनासंदर्भात त्रास होत असत्याने त्यांना 3 मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

इनोसेंट यांची अनेक दिवसांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, इनोसेंट यांनी रविवारी (काल 26 मार्च रोजी) रात्री 10.30 च्या दरम्यान जगाचा निरोप घेतला. इनोसेंट यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा सॉनेट असा परिवार आहे.

इनोसेंट यांनी पृथ्वीराज सुकुमारन यांच्या 2022 मध्ये आलेल्या कडुवा सिनेमात अभिनय केला होता. इनोसेंट यांचा हा अखेरचा सिनेमा ठरला.

तर देशात 2014 मध्ये मोदी लाट होती. या काळात दिग्गज आणि माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र इनोसेंट लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT