Malaysian Bharatnatyam Guru sri ganeshan dies collapsing on stage in Bhubaneswar
Malaysian Bharatnatyam Guru sri ganeshan dies collapsing on stage in Bhubaneswar sakal
मनोरंजन

Sri Ganeshan passed away: भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन, मंचावरच सोडला जीव..

नीलेश अडसूळ

Bharatnatyam Guru Sri Ganeshan passed away: मनोरंजन विश्वातून एक दुःखद वार्ता समोर आली आहे. ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन झाले आहे. भुवनेश्वर येथे आपल्या कलेचे सादरीकरण करत असतानाच त्यांना देवाज्ञा झाली.

(Malaysian Bharatnatyam Guru sri ganeshan dies collapsing on stage in Bhubaneswar)

त्यांचे नृत्य संपले आणि ते एकाएकी मंचावच कोसळले. आयोजकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपले सादरीकरण करताना त्यांनी मंचावर प्राण सोडले. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्री गणेशन हे मूळचे मलेशियाचे रहिवासी असून त्यांचे वय 60 वर्षे होते. आपल्या भरतनाट्यम सादरीकरणासाठी ते भारतात आले होते. परंतु भुवनेश्वर येथे ते 'गीत गोविंद' यावर आपले नृत्य सादर करत करतानाच त्यांना मृत्यू आला.

आयोजकांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांची प्रकृती उत्तम होती. अगदी सादरीकरण करेपर्यंत ते उत्तम होते. ते सादरीकरण करत असताना एका क्षणाला मंच प्रकाशमान झाला आणि कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

डॉक्टरांनी दिलेल्या अहवाला नुसार त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Exit Poll 2024 : ममतांच्या बंगालमध्ये भाजपचा डंका? महत्त्वाचे एक्झिट पोल काय सांगताएत?

Weather Update: मतमोजणीच्या दिवशी बरसणार पाऊस; पूर्व मोसमीसाठी पोषक हवामान

Modi 3.0: "जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर मी टक्कल करेन"; AAP च्या उमेदवाराचं आव्हान

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

SCROLL FOR NEXT