Tv Actress Aditi Bhatia Is Vacationing In Maldives Esakal
मनोरंजन

Maldives-Lakshadweep Controversy: मालदिवला गेली अन् फसली ! फोटो शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अदिती डिसेंबर महिन्यात मालदीवला गेली होती. मालदीव वाद सुरु असतानाच आदितीने तिचे काही फोटो पोस्ट केले होते.

Vaishali Patil

Tv Actress Aditi Bhatia Is Vacationing In Maldives: मालदीव हे बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते व्हॅकेशन डेस्टिनेशन आहे. वाढदिवस साजरा करायचा असेल किंवा ब्रेक घ्यायचा असेल तर बॉलिवूड स्टार्स मालदीवला जायचे मात्र आता परिस्थीती वेगळी आहे. अचानक बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ सामान्य लोकच नाही तर भारतीय सेलिब्रिटींनीही मालदीववर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी केली.

अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या सोशल मिडियावर मालदीवचे फोटो शेयर केले आहेत. त्यामुळे ती अचानक चर्चेत आली आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यासाठी सुरुवात केली. ती अभिनेत्री म्हणजे आदिती भाटिया.

चित्रपटांसोबत 'ये है मोहब्बतें' या मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली आदिती आता चांगलीच ट्रोल झाली आहे. अदिती डिसेंबर महिन्यात मालदीवला गेली होती. मालदीव वाद सुरु असतानाच आदितीने तिचे काही फोटो पोस्ट केले होते.

हे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच संतापले आणि त्यानी या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली,

एका नेटकऱ्याने लिहिले की, "मालदीव नाही, फक्त लक्षद्वीप." तर दुसर्‍याने तिला लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला दिला. तर एकाने लिहिले, 'नो मालदीव फक्त लक्षद्वीप'. एकाने लिहिले 'मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाका'.

आदितीने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. तिने 'विवाह', 'शूटआउट अॅट लोखंडवाला', 'द ट्रेन', 'चान्स पे डान्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ती अनेक कॉमेडी शोमध्ये देखील दिसली आहे. ट्रोल झाल्यानंतर आदितीने तिची पोस्ट डिलिट केली.

काय आहे मालदीव-लक्षद्वीप वाद?

हे प्रकरण सुरु झालं ते मालदीवच्या एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर. यानंतर हे प्रकरण तापले आहे. नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटाचे फोटो शेयर करत लक्षद्वीपमधील पर्यटन वाढण्याचे आवाहन केले. अशा परिस्थितीत सेलेब्स पंतप्रधानांच्या समर्थनार्थ पुढे आले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

Rahul Dravid Son: द्रविडचा धाकटा लेक गाजवतोय मैदान; BCCI च्या वनडे स्पर्धेसाठी झाली संघात निवड

Pension Service : पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ! आता बँकेत न जाताच घरबसल्या मिळणार लाइफ सर्टिफिकेट सेवा! जाणून घ्या कशी?

SCROLL FOR NEXT