Maldives Row PM Narendra Modi Ranveer Singh esakal
मनोरंजन

Ranveer Singh : 'अरे विषय काय तू बोलतो काय, सटकला लेका'! रणवीर सिंग का झाला ट्रोल?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला आणि त्यामुळे वेगळ्याच वादाला सुरुवात झाल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

Maldives Row PM Narendra Modi Ranveer Singh : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला आणि त्यामुळे वेगळ्याच वादाला सुरुवात झाल्याचे दिसून आले. त्यांच्या या दौऱ्यावर मालदीव आणि त्या देशातील काही राजकीय नेत्यांनी केलेली टिप्पणीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला केला. यात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील परखड शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं एक्सवर पोस्ट करत मालदीव सरकारला सणसणीत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील रोखठोकपणे मालदीव सरकारला सुनावले होते. आम्ही आत्मनिर्भर आहोत. त्यामुळे आम्हाला चुकूनही कमी लेखू नका. अशा आशयाची प्रतिक्रिया अमिताभ यांनी दिली होती. मात्र या सगळ्यात प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग हा ट्रोल झाल्याचे दिसून आले.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, मालदीवच्या ज्या मंत्र्यांनी मोदींवर टीका केली होती त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही सोशल मीडियावर हे प्रकरण वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. आतापर्यत अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भारतीय पर्यटनाला आपला पाठींबा दर्शवला आहे.

यात रणवीरनं देखील त्यांच्या एक्स अकाउंटवरुन दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे. त्यानं लक्षद्वीपमधील एका लोकेशनचा फोटो काढून पोस्ट शेयर केली होती. मात्र त्यावरुन त्याला ट्रोल करण्यात आले. रणवीरनं त्याच्या त्या पोस्टमध्ये लिहिले होते की, २०२४ मध्ये नव्या भारताचा शोध आणि आपली संस्कृतीची नव्यानं ओळख आपल्या समोर येते आहे. आपल्या देशातील समुद्रकिनारे आणि त्यांचे सौंदर्य लोभनीय आहे. आपण त्याचा आनंद घेऊयात.

चला तर मग भारतातील वेगवेगळे समुद्री बेटं शोधूया आणि तिथे जाऊन पर्यटनाचा आनंद घेऊयात. चलो भारत देखे...अशा शब्दांत अभिनेत्यानं पो्ट शेयर केली आहे.

एका युझर्सनं रणवीरनं जो फोटो पोस्ट केला आहे त्याला उद्देशुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तो म्हणतो की, तू जो फोटो पोस्ट केला आहे तो काही लक्षद्वीपचा नाही तर मालदीवच्या एका बेटाचा आहे. तू मालदीवचा फोटो शेयर करुन इंडियन आयलंडचे प्रमोशन का करतो आहेस, असा प्रश्न रणवीरला विचारण्यात आला आहे. आता रणवीरनं ती पोस्ट डिलीट केल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT