Malti Chauhan Death famous youtuber social media  esakal
मनोरंजन

Malti Chauhan : प्रसिद्ध युट्युबवर मालती देवीनं स्वत:ला संपवले, घरातच...! कुटूंबियांनी सासरच्या लोकांवर केला मोठा आरोप

प्रसिद्ध युट्युबर मालती देवीच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Malti Chauhan Death famous youtuber social media : प्रसिद्ध युट्युबर मालती देवीच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तिनं घरातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश मधील संत कबीर नगरमध्ये राहणाऱ्या मालतीनं अखेरचा श्वास घेतला आहे.

लोकप्रिय भोजपूरी युट्युबर म्हणून मालती देवीची सोशल मीडियावर मोठी क्रेझ होती. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशातच तिनं घेतलेल्या आत्मघाती निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालतीच्या कुटूंबियांनी सासरच्या व्यक्तींवर हत्येचा आरोप केला आहे.

Financial Freedom महिलांना का हवे कुटुंबाच्या गुंतवणुकींचे आणि आर्थिक व्यवहारांचे ज्ञान?

वयाच्या २३ व्या वर्षी मालतीनं या जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या वडिलांनी सासरच्या व्यक्तींविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. भोजपूरी भाभी म्हणून लोकप्रिय झालेल्या मालती देवीनं असा टोकाचा निर्णय का घेतला याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या मालतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये तिनं रडून तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सांगितलं आहे.

मला मोठ्या प्रमाणावर मानसिक आणि शाररिक त्रास दिला जात होता. मारहाण केली जायची. मालतीच्या एका मैत्रीणीचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात तिनं सांगितलं आहे की, मालतीसोबत जे झालं ते अतिशय चूकीचे होते. तिच्यावर अन्याय झाला.

या सगळ्यात मालतीच्या पतीची बाजूही समोर आली आहे. त्यानं मालतीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिला त्या व्यक्तीसोबत लग्न करायचे होते. असा आरोप मालतीवर केला आहे. तिनं याविषयी आपल्याला सांगितले होते. याबाबत सविस्तर माहिती देणारे वृत्त जनसत्तानं दिले आहे. या प्रकरणात एएसपी संतोष कुमार सिंह यांनी त्या एक्सवर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

IPL 2026 : शाsssणा... Rohit Sharma ने कुलदीप, लोकेश यांना 'मामू' बनवलं; प्रसंग सांगताना हिटमॅन खळखळून हसला Video

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

"मी पैशांसाठी बिग बॉस केलं" लपंडाव फेम रुपालीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT