man from Maharashtra asked Rashmika mandanna for marriage amitabh made his wish come true kbc 15 SAKAL
मनोरंजन

Rashmika Mandanna: महाराष्ट्रातील तरुणाने रश्मिकाला घातली लग्नाची मागणी! बिग बींनी केली त्याची इच्छा पूर्ण

रश्मिकाला महाराष्ट्रातल्या तरुणाने थेट लग्नाची मागणी घातलीय, काय घडलंय नेमकं?

Devendra Jadhav

Rashmika Mandanna News: रश्मिका मंदाना सध्या 'अ‍ॅनिमल' सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'अ‍ॅनिमल'मधील रश्मिकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली आहे.

'अ‍ॅनिमल'मध्ये रश्मिका - रणबीरच्या जोडीला लोकांनी डोक्यावर घेतलंय. अशातच महाराष्ट्रातल्या एका तरुणाने रश्मिकाला थेट लग्नाची मागणी घातली असल्याचा रंजक किस्सा समोर आलाय. अमिताभ बच्चन यांच्या KBC 15 च्या मंचावर या गोष्टीचा उलगडा झाला. काय घडलंय? वाचा.

रश्मिकाचा मोठा फॅन

KBC 15 मध्ये हॉटसीटवर बसण्याचा मान महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील प्रमोद भास्केला मिळाला. खेळादरम्यान प्रमोदने बिग बींना सांगितले की, त्याला चित्रपट पाहणे आवडते आणि तो रश्मिका मंदान्नाचा खूप मोठा चाहता आहे.

प्रमोदने असेही सांगितले की, रश्मिकाने 2016 मध्ये कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'द्वारे डेब्यू केला होता. एवढेच नाही तर रश्मिकाने सोशल मीडियावर त्याला तीनदा रिप्लाय दिल्याचेही त्याने सांगितले.

प्रमोदने घातलेली रश्मिकाला लग्नाची मागणी

स्पर्धकाने सांगितले की तो रश्मिकाचा सर्वात मोठा चाहता आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा चाहता कोणीही असू शकत नाही. प्रमोदने रश्मिकाला लग्नाचा प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले तेव्हा ते ऐकून बिग बी आश्चर्यचकित झाले आणि तिनेही त्याला प्रतिसाद दिला. हे ऐकून बिग बींनी "रश्मिकाशी बोलण्याची संधी कधी मिळाली का?" असे विचारले. यावर प्रमोद म्हणाला की, "ती सध्या अॅनिमलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे".

शेवटी सर्व पुरुषांना सल्ला देताना मेगास्टार म्हणाले, "स्त्रियांना पुरुषांना नकार द्यायला खूप आवडतो."

बिग बींनी प्रमोदची इच्छा केली पूर्ण

प्रमोदची रश्मिकाबद्दचा इतका मोठा चाहता आहे हे पाहून बिग बींनी त्याची इच्छा पूर्ण केली आणि त्याला व्हिडिओ कॉलवर अभिनेत्रीशी बोलायला लावले. प्रमोदने रश्मिकाला सांगितले की, "त्याच्या सर्व वॉलपेपरवर तिचे फोटो आहेत." रश्मिका प्रमोदला वचन देते की ती लवकरच त्याला प्रत्यक्ष भेटेल.

प्रमोदने गेम सोडला आणि 12,50,000 रुपये घरी नेले. बिग बींनी 'अ‍ॅनिमल'मधील रश्मिकाच्या गीतांजली व्यक्तिरेखेचेही खूप कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT