Shweta Rajan Instagram
मनोरंजन

थरारक!अभिनेत्रीचा शॉक सीक्वेन्स सीन व्हायरल...

'मन झालं बाजिंद' मालिकेतील कृष्णा उर्फ श्वेता राजनचं होतंय कौतूक....

प्रणाली मोरे

'झी मराठी' वाहिनीवरील मन झालं बाजिंद(Man jhala Bajind) ही मालिका सुरू होण्याआधीच चर्चेत होती ते मालिकेच्या नावामुळे. अनेकांना 'बाजिंद' या शब्दाचा अर्थ काय हे माहित नसल्यामुळे गुगल वर सर्च करून करून पार नावाचा फडशा पाडला होता. पण तेव्हा आपले गुगलमास्टरही हतबल झाले होते. अखेर नावाचा अर्थ समोर आला तो म्हणजे जिद्दी. मालिकेतील नायकासाठी बाजिंद हा शब्द वापरला गेलाय. ज्या पात्राचं नाव आहे राया. मेहनती,जिद्दी असा राया. तर कृष्णा हे नायिकेचं पात्र लाडात वाढलेलं,हुशार,सी.ए होण्याची स्वप्न पाहणारं असं. मालिकेत हळदीच्या रुपात वापरल्या गेलेल्या पिवळया रंगाचेही अनेक मायने. आता मालिकेनं गती पकडलीय. राया-कृष्णाचं लग्न झालंय. दोघांमध्ये हळूहळू एक नवीन नातं निर्माण होतंय खरं पण व्हिलन नसतील तर त्या नात्याच्या खुलण्याला अर्थच काय.

राया आणि कृष्णाच्या जीवावर अनेकजण उठलेयत. पण दोघेही प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी घडून वाचतात. पण आता कृष्णाच्या जीवावर बेतणार आहे बरं का. फॅक्टरीची मालकीण होणं तिला महागात पडणार आहे. नुकताच या मालिकेतला एक महत्त्वाचा सीन शूट करण्यात आला. ज्यात मालिकेतील नायिकेचं पात्र साकारणा-या कृष्णाला शॉक लागतो. त्या झटक्यानं ती दूरवर फेकली जाते. पण कृष्णाचं पात्र साकारणा-या श्वेतानं मात्र हा शॉर्ट स्वतः दिलाय. आणि तो शॉक सीक्वेन्स तिनं इतका परफ्केट दिलाय की दोन सेकंद तो व्हिडीओ पाहून वाटेल की खरंच शॉक लागला की काय हिला. आता खरा जिवंत अनुभव यालाच म्हणतात ना.

अभिनेत्री श्वेता राजननं हा शॉक सीक्वेन्सचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्यावर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटस् दिल्या आहेत. तिनं दिलेल्या त्या परफेक्ट शॉर्टचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय. कुणी म्हटलंय,'दोन सेकंद वाटलं की खरंच तुला शॉक लागला की काय'. मालिकेतील पुढच्या भागात आपण हा सीन पहाणार आहोत. ज्यात मालिकेतील नायिकेला मारण्याचा कट केलाय. आणि यातनंच हा घातपात घडवून आणला गेलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT