ajinkya raut instagram
मनोरंजन

'मन उडु उडु झालं'मधील अजिंक्यचा अपघात; पोस्ट केला व्हिडीओ

ठाण्याहून परभणीला जाताना झाला हा अपघात

स्वाती वेमूल

'मन उडु उडु झालं' man udu udu jhala या मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊत Ajinkya Raut अपघातातून थोडक्यात बचावला. अपघातानंतर अजिंक्यने सोशल मीडियावर त्याच्या गाडीचा व्हिडीओ पोस्ट केला. 'देवाच्या कृपेने मी ठीक आहे', असंही त्याने त्या व्हिडीओमध्ये म्हटलंय. दिवाळीनिमित्त अजिंक्य त्याच्या गावी परभणीला जात होता. याच प्रवासादरम्यान त्याचा हा अपघात झाला.

'कृतज्ञतेच्या भावनेने प्रत्येक क्षण जगा. कारण क्षणात सर्वकाही नष्ट होऊ शकतं. देवाच्या कृपेने माझे प्राण वाचले. मी ठाण्याहून परभणीला जाताना हा अपघात झाला. तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. ता.क.- मी गाडी चालवत नव्हतो', असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अजिंक्यची गाडी शेतात पडल्याचं पहायला मिळत आहे. "आमच्या गाडीचा वेग सर्वसाधारणच होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नशिबाने रस्त्याच्या बाजूला दरी नव्हती. ११०० व्होल्टच्या खांबाला आमची गाडी धडकणार होती. माझ्या मित्राने खांबाचा धक्का चुकवण्यासाठी गाडी फिरवली आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात घसरली. सुदैवाने आम्हाला गंभीर दुखापत झाली नाही", असं त्याने म्हटलं.

"कुठलाच पुरस्कार, कुठलीच प्रसिद्धी कामी येत नाही, जेव्हा एखादा जीवघेणा प्रसंग समोर येतो. या प्रसंगातून देवाने मला वाचवलं. सगळं क्षणार्धात नष्ट होण्यासारखं आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा स्वत:ची काळजी घ्या," असं तो पुढे म्हणाला. अजिंक्यच्या या व्हिडीओवर चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी कमेंट करत त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं. 'मन उडु उडु झालं' या मालिकेत अजिंक्य राऊत हा इंद्राची भूमिका साकारतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Governor Inflation: साखर-कांद्याने वाढवली महागाईची चिंता! दिवाळीत महागाई वाढणार? RBIचा मोठा इशारा

कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पुन्हा एकदा दिली गुड न्यूज; मुलगी सामायराही सोबत; फोटो व्हायरल

Navratra 2026: नवरात्री दरम्यान दुर्गा पूजेसाठी कडक नियमावली; मंडप आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी!

Latur Professor Murder : अनैतिक संबंधातून कोल्हापूरच्या प्राध्यापकाची हत्या; लातूरमधून अपहरण करुन बीडमधील खडी क्रशरवर नेले अन्... चौघांना अटक

IND U19 vs AUS U19 : तन्मय बलोडाच्या १४ विकेट्स अन् ऑस्ट्रेलियाची दाणादाण; भारताने ५ चेंडूंत जिंकली मॅच, मालिका खिशात

SCROLL FOR NEXT