Ajinkya Raut- 'Man Udu Udu Zala'(Indra) Google
मनोरंजन

'मन उडू उडू' फेम अजिंक्य राऊत म्हणतोय,'रोमान्स करेन तर बागेत'

ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य राऊतने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

झी मराठी वरील 'मन उडू उडू झालं'(Man Udu Udu Zala) ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेचं उडत्या चालीचे टायटल ट्रॅक असो किंवा त्यातील इंद्रा(Indra) आणि दीपू(Deepu) या मध्यवर्ती भूमिका असोत किंवा देशपांडे गुरुजी,सानिका,दीदी,इंद्राचा खास मित्र सत्तू,कार्तिक अशा अनेक इतर व्यक्तिरेखा असोत सगळ्यांनीच घराघरातील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान पक्क केलंय. त्यात इंद्रा आणि दीपू च्या भूमिका तर लोकांना विशेष आवडत आहेत,ते मालिकेगणिक त्यांच्या भूमिकेचा रंगणारा ग्राफ पाहून. ईसकाळ पॉडकास्टसाठी नुकतीच या मालिकेत इंद्राची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊतची मुलाखत घेतली गेली. त्या मुलाखतीत त्यानं केवळ आपल्या सिनेकरिअरविषयीच नाही तर वैयक्तिक आयुष्याविषयीही मनमोकळा संवाद साधला आहे. या मुलाखतीतलं विशेष आकर्षण म्हणजे आपल्या लाडक्या इंद्राची भूमिका साकारणाऱ्या अंजिक्यच्याच तोंडून त्याच्या खऱ्या आयुष्यातील दीपूविषयीचा खुलासा ऐकणं. त्या पॉडकास्ट मुलाखतीची लिंक आम्ही इथं बातमीत जोडत आहोत.

माझ्यावर टीका करणाऱ्यांमुळे मी अभिनेता म्हणून घडलो ,घडत आहे याविषयी सांगताना अजिंक्यने एक विशेष गोष्ट नमूद केली ती ऐकण्यासारखी आहे. त्यानं त्याच्या मोठ्या ताईविषयी एक खुलासा केला आहे. माझ्या घरातच माझे टीकाकार आहेत याविषयी सांगताना त्याने अनेक किस्से उदाहरणादाखल दिले. 'मन उडू उडू' मालिकेतील मी साकारलेला इंद्रा पाहिल्यावर घरच्यांची अवस्था त्याला पाहून काय झाली होती याविषयीही अजिंक्य बोलला आहे. बातमीत जोडलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत हे सगळे किस्से,खुलासे ऐकता येतील.

याच पॉडकास्ट(Podcast) मुलाखतीत इंद्रान त्याच्या खऱ्या आयुष्यातील दीपू संदर्भातही मोठा खुलासा केला आहे. रोमॅंटिक होणं आपल्याला आवडतं हे सांगताना त्यानं रोमान्स कसा करावा याच्या अनेक स्वतःला आवडणाऱ्या पद्धतींचा खुलासा केला आहे. आता तो नेमकं काय बोलला आहे हे ऐकायला मात्र आपल्याला 'मन उडू उडू' मालिकेत तुमचं आवडतं पात्र इंद्रा साकारणाऱ्या अजिंक्य राऊतची बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत ऐकावीच लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT