Man Yedyagat Zala Esakal
मनोरंजन

Man Yedyagat Zala: लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण; स्वानंदी आणि सुमेध यांचा सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज

Man Yedyagat Zala: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) आणि अभिनेता सुमेध मुदगलकर (Sumedh Mudgalkar) यांचा 'मन येड्यागत झालं' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

priyanka kulkarni

Man Yedyagat Zala: एका अनोख्या प्रेमाची आगळीवेगळी लव्हस्टोरी 'मन येड्यागत झालं' (Man Yedyagat Zala) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. प्रेमाची निराळी व्याख्या सांगणाऱ्या योगेश जाधव दिग्दर्शित 'मन येड्यागत झालं' या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील कलाकार. नुकतच या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झालं आहे. यामध्ये दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) आणि अभिनेता सुमेध मुदगलकर (Sumedh Mudgalkar) हे दिसत आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे ही 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पादार्पण करणार आहे.तर सुमेधने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता स्वानंदी आणि सुमेध यांची फ्रेश जोडी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. तर अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

'मन येड्यागत झालं'ची स्टार कास्ट (Man Yedyagat Zala Cast)

'श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन' अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी आणि कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. स्वानंदी आणि सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

चित्रपटातील गाणी

'मन येड्यागत झालं' या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका नक्कीच चुकवतील यांत शंका नाही. चित्रपटाच्या संगीताची धुरा निलेश पतंगे याने उत्तमरीत्या पेलवली आहे, तर गाणी सुदर्शन पांचाळ, सिद्धेश पतंगे लिखित आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांना जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, निलेश पतंगे यांनी त्यांचा सुमधुर व दमदार आवाज दिला आहे. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीचा नव्या प्रेमाचा रंग 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून येत्या 1 मार्चपासून मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT