Manasa Varanasi become Vlcc Fermina miss India 2020 manya Singh and manika sheokand runner ups
Manasa Varanasi become Vlcc Fermina miss India 2020 manya Singh and manika sheokand runner ups  
मनोरंजन

मानसा वाराणसीच्या शिरपेचात 'फेमिना मिस इंडिया 2020' चा तुरा

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  फेमिना मिस इंडिया 2020 च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नुकतीच पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात मानसा वाराणसीनं फेमिना मिस इंडिया 2020 चा किताब आपल्या नावावर केला आहे. फेमिना मिस इंडियाच्या व्हीएलसीसीच्या सर्वोत्तम विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरुन मानसा वाराणसीवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

10 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या फेमिना मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनाले मध्ये तेलंगानाच्या मानसानं यश मिळवलं आहे. याबरोबरच मान्या सिंह आणि मनिका शियोकांड फर्स्ट व सेकेंड रनर अप म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. खुशी मिश्रा, मान्या सिंह, रति हुलजी आणि मनिका शेओकांड या सर्वोत्तम 5 स्पर्धक होत्या. व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनालेचे आयोजन मुंबईतील एका बड्या हॉटेलमध्ये करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री वाणी कपूर, चित्रगंधा सिंह, नेहा धुपिया, अपारशक्ति खुराना आणि पुलकित सम्राट आणि नेहा धुपिया आदी मान्यवर उपस्थित होते.

पुलकित सम्राट आणि चित्रगंधा सिंह या अंतिम सोहळ्याचे परिक्षक होते. तर वीणानं यावेळी सादरीकरण केले. त्याला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सोहळ्यात नेहा धुपियानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. तिनं ब्ल्यु आणि व्हाईट कलरचा स्टायलिश आऊटफिट परिधान केले होते. तर चित्रगंधा यलो आऊटफिटमध्ये दिसून आली. अपारशक्ति आणि पुलकित सम्राट यांचा लूकही लक्षवेधी होता. तर वाणीनं परिधान केलेला शिमरी डार्कही सर्वांच्या चर्चेचा विषय होता.

गेल्या काही वर्षापासून या प्रकारच्या सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे. त्याचा फॉलोअर्स वेगळा आहे. खासकरुन सोशल मीडियावर त्याची होणारी चर्चा हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे याप्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनाला काही मर्यादा होत्या. 8 महिन्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्यावेळी स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती तेव्हा कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे अशी अट स्पर्धकांना होती. आरोग्याची विशेष काळजी याप्रसंगी घेण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT