mrs undercover movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : मिसेस अंडरकव्हर : सर्वच आघाड्यांवर ‘मिसफायर’

सामान्य माणूस आणि त्यातही एक महिला वेळ पडल्यास काय साहस करू शकते, हे दाखवणारे अनेक हिंदी सिनेमे आपण पाहिले आहेत.

मंदार कुलकर्णी mandar.kulkarni@esakal.com

सामान्य माणूस आणि त्यातही एक महिला वेळ पडल्यास काय साहस करू शकते, हे दाखवणारे अनेक हिंदी सिनेमे आपण पाहिले आहेत.

सामान्य माणूस आणि त्यातही एक महिला वेळ पडल्यास काय साहस करू शकते, हे दाखवणारे अनेक हिंदी सिनेमे आपण पाहिले आहेत. अनुश्री मेहता या दिग्दर्शिकेनं पदार्पणात ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटाच्या माध्यमातून या विषयाला हात घातला आहे. एक क्रूरकर्मा विरुद्ध एक गृहिणी असा संघर्ष दाखवण्याचा व महिलेला दुर्गेच्या रूपात दाखवण्याचा दिग्दर्शिकेचा प्रयत्न पोकळ कथा आणि ढिसाळ पटकथेमुळं फसला आहे. अभिनय, संगीत, चित्रण या आघाड्यांवरची चित्रपट फारशी चांगली कामगिरी करत नाही. राधिका आपटेचा अभिनय चित्रपटाला काही प्रमाणात चित्रपटाला तारत असला, तरी तिचे प्रयत्नही अपुरे ठरतात.

‘मिसेस अंडरकव्हर’ची सुरवात कोलकत्यात होते. महिलांवर राग असलेला (कशामुळं माहिती नाही.) कॉमन मॅन (सुमीत व्यास) महिलांचे खून करीत सुटला आहे. त्याचा एका अत्यंत निर्घृण हत्येच्या प्रसंगानंतर कॅमेरा थेट एका मध्यमवर्गीय घरातील दुर्गावर (राधिका आपटे) जातो. दहा वर्षांपूर्वी मुंबईत स्थापन झालेल्या एका स्पेशल फोर्सचे प्रशिक्षण देऊन तिला कोलकत्यात पाठवण्यात आलेलं असतं, मात्र त्यानंतर तिला कोणतंही काम दिलं जात नाही.

त्यामुळं (?) ती आता संसारात रमली आहे. रंगिला (राजेश शर्मा) हा अधिकारी आता खून करीत सुटलेल्या कॉमन मॅनला पकडण्यासाठी दुर्गापर्यंत पोचतो व तिला हे ऑपरेशन तडीस नेण्याची गळ घालतो. दुर्गाची पती देव याला (साहेब चटर्जी) दुर्गाचा इतिहास माहिती नसतो. कॉमन मॅनला शोधण्यासाठी दुर्गा प्रयत्न सुरू करते, कोलकता कॉलेजमध्ये प्रवेश घेते. अनेकदा अडचणीत सापडते, त्यांवर मात करते. पुढे काय होतं त्याची कथा ‘मिसेस अंडरकव्हर’मध्ये पाहायला मिळते.

चित्रपटाच्या कथेत महिला सबलीकरणाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला असली, तरी गंभीर अंगानं पुढं न्यायची की विनोदी; यात दिग्दर्शिकेचा उडालेला गोंधळ कथेला मारक ठरतो. खूप गंभीर प्रसंगानंतर अत्यंत फालतू विनोदी प्रसंगांची मालिका सुरू राहते व पुढं काय होणार याचा अंदाज अगदी लहान मुलांनाही येईल अशी परिस्थिती असल्यानं कथेतील रस निघून जाते. पटकथेतील चुकाही खूपच गंभीर आहेत. दुर्गानं प्रवेश घेतलेल्या कॉलेजमध्येच कॉमन मॅन का व कसा येतो याचा कोणताही खुलासा केला जात नाही. कॉमन मॅनच्या (आर. के. लक्ष्मण यांच्या लोकांच्या मनात घर केलेल्या पात्राचं नाव अशा क्रूरकर्मा व्यक्तीसाठी घेणं हीसुद्धा चूकच) महिलांवरील रागाचं कारण कुठंही फारसं स्पष्ट न केल्यानं कथेचा पायाच हरवून जातो. चित्रपटाचा शेवटही अगदीच अपेक्षित असून, तोही उरकण्यात आला आहे. चित्रपटाचं संगीत लक्षात राहत नाही व चित्रणाच्या आघाडीवरही कामगिरी निराशाजनक आहे.

राधिका आपटेचं विनोदाचं टायमिंग आणि गंभीर भूमिकांतील आवेश पाहण्यासारखा असतो. इथं तिला दोन्ही दाखवण्याची चांगली संधी आहे व ती तिनं साधली आहे. मात्र, कथेची साथ न मिळाल्यानं तिचा भूमिका वरवरची ठरते.

सुमीत व्यासच्या भूमिकेच्या लिखाणात अनेक त्रुटी असल्यानं तो नक्की काय करतो आहे, हेच समजत नाही. राजेश शर्माची भूमिका पातळ करण्याचे सगळे प्रयत्न झालेले दिसतात. इतरांना फारशी संधी नाही. एकंदरीतच, सर्वच आघाड्यांवर ‘मिसफायर’ झालेला हा ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट खूप पेशन्स असेल, तरच पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Stomach Bloating: पोटफुगीची समस्या कशी कमी करावी? डॉक्टरांनी सांगितले 5 प्रभावी उपाय

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि करू नये? जाणून घ्या नियम

Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत

Shubhanshu Shukla : अवकाशात खूप भिती वाटते, पण....गगनयान मिशनबद्दल काय बोलले अंतराळवीर शुभांशू शुक्ला? पाहा व्हिडिओ.

SCROLL FOR NEXT