मनोरंजन

प्रथेला छेद देत मंदिराने पतीवर केले अंत्यसंस्कार; मन हेलावून टाकणारे दृश्य

मंदिरा बेदीच्या पतीचं बुधवारी पहाटे निधन

स्वाती वेमूल

अभिनेत्री मंदिरा बेदीवर Mandira Bedi बुधवारी पहाटे दु:खाचा डोंगर कोसळला. पती राज कौशल Raj Kaushal यांचे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. या कठीण काळात मंदिराचं सांत्वन करण्यासाठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार पोहोचले होते. राज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रोनित रॉय, आशिष चौधरी यांच्यासह इतरही टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले होते. राज यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना मंदिरासुद्धा त्याच रुग्णवाहिकेत होती. इतकंच नव्हे तर अनेक वर्षांपासून चालू असलेल्या प्रथेला छेद देत मंदिराने राज यांचं पार्थिव उचललं होतं. साधारणपणे हे सर्व कार्य पुरुषच करतात. मात्र मंदिराने या वर्षानुवर्षांपासूनच्या प्रथेला छेद दिला. (Mandira Bedi broke gender stereotypes as actress performed the last rites of husband Raj Kaushal)

राज आणि मंदिराने १९९९ साली लग्न केलं होतं. या दोघांना तारा ही मुलगी आणि वीर हा मुलगा आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंदिरा आणि राजने चार वर्षीय ताराला दत्तक घेतलं. मुलीला दत्तक घेतल्यानंतर मंदिरा आणि राज खूप खूश होते. त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली होती. रविवारी मंदिरा आणि राज यांनी एका गेट-टुगेदरचं आयोजन केलं होतं. या पार्टीला नेहा धुपिया, अंगद बेदी, सागरिका घाटगे, झहीर खान, आशिष चौधरी आणि त्यांची पत्नी यांनी हजेरी लावली होती.

अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या राज यांनी तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. 'प्यार मे कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Playoff Race: राजस्थान की गुजरात? आज जो जिंकेल तो थेट अव्वल दोनमध्ये झेप घेणार; पाहा प्लेऑफचं नवं समीकरण

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

Vidarbha News: सिहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; उभे धान पिक जमिनदोस्त; सिंदपुरी, मोहाडी खापा, मुरली, सोनेगांव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Nagpur News: रेशीमबाग मैदान धावपटूंसाठी बंद!; प्रशासनाने सर्व गेटला कुलूप लावल्याने खेळाडू सरावापासून वंचित

Latest Marathi News Live Update : हैदराबादमध्ये ‘आयपीएस’च्या पत्नीची हत्या

SCROLL FOR NEXT