mangesh desai experience of visit cm eknath shinde ganpati darshan at varsha bunglow SAKAL
मनोरंजन

Cm Eknath Shinde: "गेल्या ६० वर्षात वर्षावर असं कधी घडलं नाही", मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलेले मंगेश देसाई मनातलं बोलले

मंगेश देसाईंनी मुख्यमंत्र्यांच्या घरी असलेल्या गणपती दर्शनाचा अनुभव शेअर केला

Devendra Jadhav

Cm Eknath Shinde: सीएम एकनाथ शिंदेंच्या घरी गणपती दर्शन घ्यायला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या घरी अनेक मराठी कलाकार एकत्र आले होते. सीएम एकनाथ शिंदेंनी सर्व मराठी कलाकारांचा चांगला पाहूणचार केला.

अशातच धर्मवीर सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाईंनी वर्षावर गणपती दर्शनाचा अनुभव सोशल मिडीयावर शेअर केलाय.

(mangesh desai experience of visit cm eknath shinde ganpati darshan)

मंगेश देसाईंनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या घरी अनेक मराठी कलाकार गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करुन मंगेश देसाई लिहीतात, गेल्या 60 वर्षात जो सोहळा वर्षा बंगल्यात घडला नाही तो मागच्या वर्षा प्रमाणे याही वर्षात झाला .गणेश दर्शन सोहोळा .संपूर्ण चित्रपट ,मालिका ,नाट्य सृष्टी वर्षा बंगल्यावर मा .मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निमंत्रणाचा स्वीकारकरून गणेश दर्शन आणि स्नेहभोजनाला जमली होती .

मंगेश देसाई पुढे लिहीतात, "एखाद्या वास्तूत येतांना सकारात्मक उर्जेसह येणे आणि तशीच सकारात्मकता देऊन जाणे या पेक्षा मोठ्या शुभेछया कुठल्याच नाहीत .मा मुख्यमंत्री सगळ्यांना भेटून विचारपूस करत होते ,खासदार श्रीकांतजी प्रत्येकाला भेटून मनसोक्त गप्पा मारत होते .हे केवळ सामन्यांची जाणीव आणि कलावंतांवर प्रेम असेल तरच शक्य आहे .मलाही आरतीचा लाभ मिळाला .बाप्पा कडे एकच मागणं ,साहेबांची प्रकृती उत्तम ठेव ,आणि पुढच्या वर्षात पुन्हा साहेबांच आमंत्रण सगळ्यांना येऊ दे आणि तुझं दर्शन घडू दे."

निर्माता - अभिनेता मंगेश देसाईंनी घेतला पुढाकार

धर्मवीर सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी पुढाकार घेऊन सर्व मराठी कलाकारांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एकत्र आणले.

यावेळी विशाखा सुभेदार, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी, नम्रता संभेराव, जयवंत वाडकर, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, दीपाली सय्यद, ओंकार भोजने, सुकन्या मोने, रसिका वेंगुर्लेकर, सचिने गोस्वामी असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Kolhapur LPG Tanker Accident : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर LPG Gas टँकर पलटी; चालक जागीच ठार, रात्री 10 नंतर 'या' मार्गावरील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Shendurwada Crime : अपहरण करून चालकास बेदम मारहाण; वाळुज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT