fashion designer  Team esakal
मनोरंजन

मनीष मल्होत्रा सहित तीन फॅशन डिझायरची ईडीकडून चौकशी

तीन फॅशन डिझायनरला तपासासाठी बोलवण्यात आले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये काम करणा-या तीन प्रसिद्ध फॅशन डिझायनरला आता ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे बॉलीवडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यात प्रख्यात डिझायनर मनीष मल्होत्रा, सब्य़साची आणि रितु कुमार यांचा यात समावेश आहे. ईडीनं त्यांना नेमकं का बोलावलंय हे अद्याप कळालेलं नाही. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पंजाबच्या एका नेत्याकडून लाखो रुपये घेतल्याची माहिती पुढे आली आहे. (manish malhotra sabyasachi and ritu kumar under ed scanner for cash payments by politician)

तीन फॅशन डिझायनरला (fahion desinger) पुढील तपासासाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. त्यात अनेक बॉलीवूडमधील सेलिब्रेटींची नावं पुढं आली होती. पंजाब कॉग्रेसमधील एका नेत्याकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप त्या फॅशन डिझायनवर केला होता. त्या पंजाबच्या आमदारानं अवैधरित्या लाखो रुपये या डिझायनरला दिले होते.

ज्या पंजाबच्या आमदाराचं याप्रकरणात नाव आलं आहे त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या बँक खात्याची माहिती तपासण्याचे काम सुरु आहे. यावेळी अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्यानंतर ईडी नंतर तीन फॅशन डिझायनरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मनीष मल्होत्रा, रितु कुमार आणि सब्यसाची हे मोठमोठ्या सेलिब्रेटींची कपडे डिझाईन करतात. परदेशातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींचीही कपडे डिझाईन करण्याचे काम ते करतात.

फॅशन शो शिवाय या डिझायनरच्या डिझाईनची किंमत लाखोंच्या घरात असते. आता एजेन्सीच्या वतीनं आयकर विभागालाही पाचारण करण्यात आले आहे. त्यात सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. येत्या दिवसांत या फॅशन डिझायनरच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT