Manish Paul meet amitabh bachchan Every year before Diwali, know the reason diwali 2023  SAKAL
मनोरंजन

Diwali 2023: दरवर्षी दिवाळीच्या आधी मनीष पॉल बिग बींना भेटायला जातो, हे आहे खास कारण

मनीष पॉल दरवर्षी दिवाळीला अमिताभ बच्चन यांची भेट घेतो, कारण जाणुन घ्या

Devendra Jadhav

Manish Paul and Amitabh Bachchan News: भारतातील नव्हे तर जगभरातील प्रत्येक नागरीक दिवाळी सणाची वाट पाहत असतात. दिवाळी आली की सर्वत्र वातावरण प्रसन्न होतं. कुठे फराळ खाऊन, कुठे फटाके फोडून, कुठे रांगोळी तर कुठे दिव्यांची रोषणाई करुन प्रत्येकजण दिवाळी उत्साहात साजरी करतात.

दिवाळीनिमित्त बॉलिवूडमध्ये सुद्धा अनेक पार्टी इव्हेंटचं आयोजन करण्यात येतं. अशातच दिवाळीनिमित्त आम्ही तुम्हाला एक खास किस्सा सांगणार आहोत. सुप्रसिद्ध सुत्रसंचालक, अभिनेता मनीष पॉल दरवर्षी दिवाळीआधी अमिताभ बच्चन यांच्या घरी जातो. काय आहे यामागचं कारण? जाणुन घ्या.

मनीष पॉलने काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. यात तो आणि अमिताभ बच्चन दिसुन येत आहेत. हा फोटो पोस्ट करुन मनीष पॉलने मनातल्या भावना व्यक्त केल्या.

दरवर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये अमिताभ बच्चन यांना भेटायला मनीष पॉल आतुर असतो. यामागचं कारण त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये उघड केलंय

हा फोटो शेअर करताना मनीष पॉल लिहितो, "माझे त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आपुलकी सर्वांना माहित आहे. मी आज ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन. अनेक वर्षांपासून मी एक नियन पाळत आहे, तो म्हणजे माझा दिवाळी सण नेहमीच त्यांच्यासोबत सुरू होतो. एक आणि एकमेव अमिताभ बच्चन सरांचे प्रेम आणि आशीर्वाद घेऊन मी माझ्या दिवाळीची सुरुवात करतो. अमिताभ यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण नेहमीच अविस्मरणीय असतो."

अशाप्रकारे दरवर्षी अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मनीश पॉल त्यांच्या घरी जातो. आणि बिग बींनी दिलेल्या शुभेच्छा आणि सदिच्छांचा स्वीकार करुन मनीष दिवाळीची सुरुवात करतो.

मनीषला आपण रफुचक्कर, जुग जुग जियो अशा काही सिनेमांमध्ये गेल्या महिन्यात अभिनय करताना पाहिलंय. तर अमिताभ लवकरच रजनीकांत सोबत थलैवर 350 या सिनेमातुन भेटीला येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Turmeric Market Price : हळदीला सोन्याचा भाव! सांगलीच्या बाजार समितीत हळदीला क्विंटलला तब्बल 65 हजार रुपये दर; दुष्काळामुळे उत्पादनात 40 टक्के घट

Raigad News: कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला पालकमंत्र्यांचा पाठिंबा; ७० हजार झाडे तोडणार, ७५ हजार लावणार!

Bay of Bengal Low Pressure Area : राज्यात थंडीची चाहूल पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात निचांकी ११.३ अंश तापमानाची नोंद

IND vs NZ 4th ODI Live: रोहित शर्मा, इशान किशन यांच्याकडून मोठी चूक; आकिब नबीला राग अनावर, दोन चेंडूंत नाट्यमय घडामोडी Video Viral

Maharashtra Tunnel Road: प्रवास होणार सुसाट! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात ३ भुयारी मार्ग; कुठून कुठे जाणार नवे मार्ग?

SCROLL FOR NEXT