मनोरंजन

संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांच्या मदतीसाठी मनीष पाॅलचा ही पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अनेक गोरगरीबांना मदतीचा हात सेलिब्रेटी देत आहेत. कित्येक कलाकारांनीआपापल्या परीने मदत केली आहे. अभिनेता सोनू सूद गरीब मजदूरांचा मसिहा बनला आहे. अनेक मजुरांना त्याने त्यांच्या गावी पाठविले आणि मजुरांनी त्याला धन्यवाद दिले आहेत. अभिनेता मनीष पाॅलदेखील वारंवार मदतीचा हात देत आहे. यापूर्वी त्याने पंतप्रधान सहायता निधीला वीस लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच ४० मजुरांना पैसे वगैरे देऊन त्याने त्यांच्या घरी पाठविले आहे. आता त्याने दिल्ली तसेच मुंबई येथील पाचशे मजुरांना फूटवेअरचे वाटप केले आहे. त्यांनी मनीष पाॅलला धन्यवाद दिले आहेत.

हिंदी तसेच टीव्हीवरील काही मालिकांमध्ये मनीष पाॅलने काम केले आहे. सूत्रसंचालक म्हणून टीव्हीवर त्याला चांगलीच लोकप्रियता मिळालेली आहे. सध्या कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मजुरांचे हाल खूप होत आहेत. अशा मजुरांसाठी मनीष पाॅल मदत करीत आहे. त्याने त्याच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच अन्य मंडळींना त्यांच्या पगाराची आगाऊ रक्कम दिली आहे. लाॅकडाऊनमुळे आपले कर्मचारी आणि अन्य मंडळींना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी त्याने घेतली आहे. तसेच मनीष पाॅलने व्हाॅट इफ नावाची एक शाॅर्टफिल्म यू ट्यूबवर प्रदर्शित केली आहे. लाॅकडाऊनवर गंभीर भाष्य करणारी आणि चांगला मॅसेज देणारी ही शाॅर्टफिल्म आहे. या शाॅर्टफिल्ममधून येणारे उत्पन्न तो कोरोनाशी लढणाऱ्या लोकांना मदत म्हणून देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : राजकोटच्या काही भागांत मुसळधार पाऊस

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT