Manisha Rani comment On Mahesh Bhatt esakal
मनोरंजन

Manisha Rani : महेश भट्ट यांच्या किसिंग प्रकरणावर मनिषानं दिली प्रतिक्रिया, 'तो माणूस तर....'!

दुसरीकडे आपल्या वडिलांना विनाकारण नावं ठेवणाऱ्यांना लेक पूजा भट्टनं चांगलेच सुनावले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Manisha Rani comment On Mahesh Bhatt - बिग बॉस ओटीटी २ मध्ये तो प्रसंग घडल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यानं केलेल्या कृतीचा नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन तीव्र शब्दांत निषेधही केला होता. आता त्यावर सेलिब्रेटी मनिषा राणीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दुसरीकडे आपल्या वडिलांना विनाकारण नावं ठेवणाऱ्यांना लेक पूजा भट्टनं चांगलेच सुनावले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिनं देखील परखड शब्दांत मनिषा ऐकवलं आहे. त्याचे झाले असे की, बिग बॉस ओटीटी २ मध्ये काही दिवसांपूर्वी पूजा भट्टचे वडील महेश भट्ट आले होते. यावेळी त्यांनी स्पर्धेतील मनिषाच्या हाताला किस केले होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

नेटकऱ्यांनी महेश भट्ट यांना खूपच वाईट पद्धतीनं ट्रोल केले होते. यावर आता मनिषाची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉस ओटीटी २ भलेही संपला असेल पण त्यातील काही गोष्टींमुळे तो अजूनही चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती महेश भट्ट आणि मनिषा राणी यांच्या त्या व्हिडिओची. यंदाच्या सीझनमध्ये एल्विश यादवनं विजेतेपद मिळवलं.

मनिषा ही यंदाच्या बिग बॉस ओटीटी २ ची सेकंड रनर अप राहिली. त्यानंतर तिनं पत्रकारांशी संवादही साधला. त्यावेळी तिला महेश भट्ट यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, लोकं काहीही बोलतात, त्यांना नेमके काय झाले हे माहितीही नाही. ती व्यक्ती किती मोठी आहे याविषयी आपण विचारही करत नाही. महेश भट्ट हे बिग बॉस ओटीटीच्या घरात आल्यानंतर त्यांनी मनिषाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी बोलता बोलता तिच्या हाताला किस केले होते.

सोशल मीडियावर त्या व्हिडिओची खूपच चर्चा झाली होती. यावर मनिषा म्हणते की, मी महेश सरांना नेहमी एका वडिलांच्या रुपात पाहिले आहे. त्यांनी माझ्याशी खूपच प्रेमानं गप्पा मारल्या. त्यांनी माझ्याशी एक मुलीच्या नात्यानं संवाद साधला. महेश भट्ट एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की, मी त्यांना पाहून खूपच प्रभावित झाले होते. ते काय करत होते याचा मला विसर पडला होता. त्यांनी जे काही केले याचा लोकांनी चूकीचा अर्थ काढला आहे. ती व्यक्ती खूपच वेगळी आहे.

एका बापानं मुलीला किस केलं यात गैर काय आहे, बाप मुलीची गळाभेट घेऊ शकत नाही का, तो माणूस खूप चांगला आहे. मी स्वताला खूपच धन्य समजते की, कित्येक गोष्टी मला त्यांच्याकडून कळल्या. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला मार्गदर्शन केले होते. असेही मनिषानं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT