Manoj Bajpayee Birthday news his struggle drama school rejection suicide career success sakal
मनोरंजन

Manoj Bajpayee Birthday: 'त्या' घटनेनंतर आत्महत्या करणार होते मनोज वाजपेयी; पण..

मनोज वाजपेयीचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने ही खास बात..

नीलेश अडसूळ

Manoj Bajpayee Birthday: बिहारमधील एका लहानश्या गावातून येऊन आज बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करणारा अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी. मनोजने आपल्या आपल्या दमदार अभिनयाने कायमच बॉलीवुडला चकित केलं आहे.

त्यांचे चित्रपट असो किंवा वेब सिरिज प्रेक्षकांच्या त्याच्या अभिनयाल कायमच पसंती मिळाली आहे. 'फॅमिली मॅन' मधील त्याच्या कामाचे प्रेक्षक दिवाने आहेत. आज सर्वांच्या नजरा मनोजच्या कामाकडे लागलेल्या असतात.

पण हे यश सहज मिळालेले नाही. मनोजने इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केला आहे. एक वेळ अशी होती की काम तर सोडा, मनोजला ड्रामा स्कूलमध्येही कुणी घेत नव्हते. पण तो मागे हटला नाही. त्याने जिद्दीने स्वतःचे अस्तित्व जगाला दाखवून दिले. अशा मनोज वाजपेयीला आजवाढदिवस, त्यानिमित्ताने पाहूया एक खास आठवण..

(Manoj Bajpayee Birthday news his struggle drama school rejection suicide career success)

बिहार मधील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या मनोजने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण मनोजला डॉक्टर नाही तर अभिनेता बनायचे होते. मनोजचे नाव अभिनेता मनोज कुमार यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते, कदाचित त्यामागेही नियतीच असावी.

पण हा प्रवास त्याच्यासाठी एखाद्या अग्नीदिव्या सारखा होता. अभिनयाची आवड त्याला तशी खूप उशिरा लागली. शाळेत तर तो खूप लाजाळू स्वभावाचा होता. त्याचा हा लाजाळू स्वभाव बदलावा म्हणून शाळेतील शिक्षक त्याला वर्गात उभे राहून हरिवंश राय बच्चन यांची कविता म्हणायला सांगायचे.

पण हळूहळू मनोजला अभिनयाचे वेड लागले आणि आणि त्याने त्यासाठी कसून मेहनत घेतली. आपल्यालाही दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये अभिनय प्रशिक्षण घेता यावे अशी मनोजची तीव्र इच्छा होती. पण असे झाले नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, मनोजला एकदा नाही तर तब्बल तीन वेळा एनएसडी मध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

नसीरूद्दीन शहा, ओम पुरीसारखे दिग्गज स्टार एनएसडीतून घडले, तिथे आपणही शिकावं ही त्याची इच्छा पूर्ण झाली नाही त्यामुळे मनोज नैराश्यात गेला. अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने चौथ्यांदा प्रवेशासाठी अर्ज केला. पण याहीवेळी त्याला नकार मिळाला. त्यावेळी मनोज पुरता खचला आणि अपान आता आत्महत्या करूया असा विचार त्याच्या मनात आला.

पण याचदरम्यान रघुवीर यादव यांनी त्याला अ‍ॅक्टिंग वर्कशॉप करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर १९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर मनोजने कधीही मागे वळून पाहिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT