Manoj Bajpayee opens up about his retirement plans: Esakal
मनोरंजन

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी घेणार रिटायरमेंट? नंतर मुंबई सोडणार अन्

Vaishali Patil

Manoj Bajpayee opens up about his retirement plans: मनोरंजन विश्वात अनेक आघाडीचे कलाकार आहेत मात्र त्यात असे काही कलाकार आहेत ज्यांनी समाजाची सर्व बंधने झुगारून स्वत:ला सिद्ध केले आणि अभिनयाच्या जोरावर प्रगतीच्या शिखरवार पोहचले आहेत. यातच आवर्जून नाव घेतलं जात ते मनोज बाजपेयीचं..

तो त्याच्या पत्येक चित्रपटात अभिनयाची छाप सोडतो. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सिर्फ एक बंदा काफी है' हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. फॅमिली मॅननंतर तर मनोजला मनोरंजन विश्वात वेगळीच ओळख मिळाली.

त्याने केवळ रुपेरी पडद्यावरच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अभिनय कौशल्य दाखवले आहे. मनोज बाजपेयीची लोकप्रियता काही कमी नाही. मनोज बाजपेयी हे नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत असतो. तो जवळपास तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे.

'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला मनोज नुकताच त्याच्या निवृत्तीच्या योजनांबद्दल बोलला. तो म्हणाला की त्याला मुंबई आवडत असली तरी तो मुंबईत राहणार नाही.

काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्ली टेल्सला मुलाखत दिली होती . या मुलाखतीत त्यांने अनेक प्रश्नाची उत्तर दिली यावेळी त्यांला त्यांची सुटी कुठे घालवायची आहे, त्याचबरोबर त्याला मुंबई आणि दिल्लीमध्ये कोणते ठिकाण जास्त आवडते. बऱ्याच प्रश्नाची त्याने उत्तरे दिली.

याचदरम्यान जेव्हा त्याला विचारण्यात आले की, जर त्यांने चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली तर त्यांना कुठे राहायला आवडेल. यावेळी त्याने सांगितले की त्याला मुंबईपासून दूर डोंगरात राहायला आवडेल असे सांगितले.

तर एका दुसऱ्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मनोजने त्याच्या निवृत्तीच्या योजनांबाबत काही हिंट दिली. ज्या दिवशी त्याला समाधान वाटेल त्याच दिवशी तो अभिनय सोडून निवृत्त होईल मात्र त्याला त्याचं काम करायला खुप आवडत त्यासाठी तो नेहमीच उत्सूक असल्याचे देखील त्याने सांगितले.

काही दिवसांपुर्वी त्याने तो कधीही राजकारणात येणार नसल्याचे सांगितले होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बिहार दौऱ्यादरम्यान त्यांनी लालू प्रसाद यांची त्यांच्या 10, सर्कुलर रोड येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यांमुळे चर्चांना उधाण आले होते मात्र मनोजने त्याचे खंडण केले.

मनोज हा उत्तम अभिनेता असून त्याने तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळवले आहेत. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो अलीकडेच 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटात दिसला जो Zee5 प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. याशिवाय 'झोरम' आणि 'डिस्पॅच' या चित्रपटांमध्येही तो दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT