Manoj Bajpayee Bollywood Actor Joram Movie esakal
मनोरंजन

Manoj Bajpayee : 'तू कोणत्या राजकीय पक्षात जाणार', 'फॅमिली मॅन' चा श्रीकांतनं काय बोलून गेला?

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मनोजनं त्याच्या चित्रपटातून आपण किती ताकदीचे अभिनेते आहोत हे दाखवून दिले आहे.

युगंधर ताजणे

Manoj Bajpayee Bollywood Actor Joram Movie : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी हा त्याच्या जोराम नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. शूल, सत्या, गॅग्स ऑफ वासेपूर, द फॅमिली मॅन, सारख्या कलाकृतीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या मनोजचा चाहतावर्ग मोठा आहे. मोठ्या संघर्षातून त्यानं त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मनोजनं त्याच्या चित्रपटातून आपण किती ताकदीचे अभिनेते आहोत हे दाखवून दिले आहे. सध्या त्याच्या एका मुलाखतीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची चर्चा होत आहे. एबीपीनं घेतलेल्या त्या मुलाखतीमधून मनोजनं त्याच्या राजकीय पक्षातील प्रवेशाविषयी सडेतोडपणे भाष्य केले आहे.

ज्या कौटूंबिक पार्श्वभूमीतून मी आलो त्यात माझा राजकारणाशी फार जवळचा संबंध होता. मी त्याच्याशी समरस होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण, नेतेमंडळी, त्यांची धोरणं याविषयी मला माहिती आहे. तो नेहमीच माझ्या आवडीचा भाग राहिला आहे. कुठल्याही एखाद्या नेत्याच्या राजकीय प्रवासाचा आढावा घ्यायचा झाल्यास मी तो फार उत्सुकतेनं घेतो. असेही मनोजनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले.

जेव्हा राजकारणावर चर्चा सुरु झाली तेव्हा मनोजला त्याच्या आगामी काळातील राजकीय प्रवेशाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, माझे खूप सारे मित्र हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी मला राजकारणात येण्याचे सल्लेही दिले आहे. मलाही राजकारण आवडते. ते मला त्यावरुन येत्या काळात कोण विजयी होणार यावरुनही प्रश्न विचारतात पण त्यावरील आमची चर्चा ही अत्यंत गोपनीय अशीच असते.

प्रत्येक राजकीय पक्षानं मला ऑफर दिली आहे. त्यांनी मी त्यांच्या पक्षामध्ये यावं यासाठी आवाहनही केलं आहे. गेल्या २५ वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षातील लोकांनी मला राजकारणात यावं म्हणून आग्रहही केला आहे. पण मी त्याला उत्सुक नाही. जर मला त्यात खरचं भाग घ्यायचा असेल तर मी कधीही ते करु शकतो. पण तुर्तास नाही.

मनोज वाजपेयीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास त्याचा जोराम नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. बऱ्याच दिवसांपासून त्या चित्रपटाची चर्चा आहे. त्यामध्ये त्यानं व्यवस्थेशी लढणाऱ्या एका बापाची भूमिका साकारली आहे. देवांशिश मखिजानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये मनोजसोबत मोहम्मद झिशान आयुब दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT