Manoj Bajpayee Bollywood Actor Reaction  esakal
मनोरंजन

Manoj Bajpayee : शाहरुखच्या लेकीचा 'आर्चीज' पाहिल्यावर मनोजची रोखठोक प्रतिक्रिया, 'मी आजवरच्या आयुष्यात...'

यंदाच्या वर्षी बॉलीवूडमधील दिग्गज स्टार सेलिब्रेटींच्या मुलांनी डेब्यू केल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

Manoj Bajpayee Bollywood Actor Reaction : यंदाच्या वर्षी बॉलीवूडमधील दिग्गज स्टार सेलिब्रेटींच्या मुलांनी डेब्यू केल्याचे दिसून आले. त्यात किंग खान शाहरुखची लेक सुहाना खान, बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर यांची नावं सांगता येतील. सध्या त्यांचा झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे.

द आर्चीच पाहण्यासाठी जे खास स्क्रिनिंग मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले होते त्याला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, श्वेता बच्चन, करिना कपूर, करण जोहर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान, गौरी खान आर्यन खान उपस्थित होते. त्याची जोरदार चर्चाही झाली होती. अखेर त्या चित्रपटावरुन सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया होत्या त्या फारशा कौतुकास्पद नव्हत्या.

या सगळ्यात आता प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. तो त्याच्या लेकीसोबत द आर्चीज नावाचा चित्रपट पाहायला गेला होता. त्यानंतर त्याला त्या चित्रपटाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यानं आपल्या नेहमीच्या रोखठोक अंदाजात दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

मनोज काय म्हणाला?

तुम्हाला सांगतो मी ५० मिनिटांपर्यत हा चित्रपट पाहिला. खरं सांगायचं तर आर्चीज हा काही माझ्या बालपणीचा विषय नाही. ते पाहून किंवा ऐकून मी काही मोठा झालेलो नाही. माझ्या बालपणात मोटू पतलू किंवा राम बलराम या व्यक्तिरेखा होत्या. मी फार तर द आर्चीजविषयी एखाद दुसरं पुस्तक वाचलं असेल यापलीकडे काही नाही. पण वेरोनिका आणि बेट्टी हे माझ्या लक्षात आहेत. असे मनोजनं यावेळी सांगितले.

मनोजनं हा चित्रपट त्याच्या मुलीसोबत पाहिल्यानंतर त्याबाबत तो म्हणाला, मी अवाला म्हणालो की, जसं त्या चित्रपटामधील ती पात्रं हिंदीत बोलतात तसे तिनं देखील हिंदीत बोलावं. पण माझी ही गोष्ट अवाला आवडली नाही. तिनं मला म्हटलं, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, प्लीज मला फिल्म पाहू द्या....तिला ती फिल्म आवडली. असेही मनोजनं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

SCROLL FOR NEXT