Manoj Bajpayee, Manoj Bajpayee news, Manoj Bajpayee movies, shool full movie, banda full movie
Manoj Bajpayee, Manoj Bajpayee news, Manoj Bajpayee movies, shool full movie, banda full movie SAKAL
मनोरंजन

Manoj Bajpayee मुळे या मराठी अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एंट्री, आज गाजवतोय मनोरंजन विश्व

Devendra Jadhav

Manoj Bajpayee News: मनोज वाजपेयी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि चर्चेत असलेलं नाव. मनोज वाजपेयी यांनी आजवर अनेक सिनेमांमधून त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली. मनोज वाजपेयी हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान आहेत.

मनोज वाजपेयी यांनी शून्यातून जग निर्माण करत स्वतःचं असं स्थान निर्माण केलंय.मनोज वाजपेयींमुळे एक मराठी अभिनेता बॉलिवूडला मिळालाय. हा अभिनेता म्हणजे सयाजी शिंदे.

(Manoj Bajpayee discovered marathi actor sayaji shinde for bollywood )

मनोज वाजपेयींमुळे सयाजी शिंदे यांची इंडस्ट्रीत एंट्री झाली. मनोज वाजपेयींनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत हा संपूर्ण किस्सा सांगितला.

मनोज वाजपेयी शूल सिनेमाचं शूटिंग करत होते. यात सयाजी शिंदे यांनी बच्चू यादव या खलनायकाची भूमिका साकारली.

सयाजी शिंदेंच्या करियरमधली ही अजरामर भूमिका ठरली. शूल सिनेमा गाजला तो मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदेंच्या अभिनयामुळे. शूल सिनेमासाठी सयाजी शिंदेंना संधी मिळण्यात मनोज वाजपेयींचं मोठं योगदान आहे.

मनोज वाजपेयी म्हणाले, "शूल सिनेमाचं शूटिंग भोपाळ मध्ये सुरु होतं. क्लायमॅक्स मध्ये सयाजी शिंदे आणि माझ्यात संघर्ष दिसतो. सयाजी शिंदे सिनेमात खलनायक होते. त्याला मी शोधून आणल होतं या सिनेमासाठी.

सयाजी सोबतचे ते संबंध आजपर्यंत तसेच आहेत. या सिनेमात जे मराठी अभिनेते होते त्यांच्याशी आजपर्यंत संबंध टिकून आहेत. काय सुंदर काम केलंय सयाजीने."

पुढे सयाजी शिंदेंच्या अभिनयाबद्दल मनोज वाजपेयी म्हणाले, " सयाजीला मोतीहारी मधल्या एका घरात ठेवलं होतं. सयाजीला तो बिहारी लहेजा शिकायचा होता.

सयाजीने शूटिंगआधी १० दिवस ती भाषा आणि तो लहेजा शिकला. एक मराठी अभिनेत्याने बच्चु यादव सारखं बिहारी खलनायक ज्या पद्धतीने केलंय ते एकदम अद्भुत आहे." असं सयाजी म्हणाले.

मनोज वाजपेयी यांच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या जेलमध्ये असणाऱ्या आसाराम बापुच्या त्या प्रकरणानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

सध्या त्या प्रकरणावर बंदा नावाचा चित्रपट येत असून त्यामध्ये आसाराम बापुच्या विरोधात कोर्टामध्ये लढणाऱ्या वकिलीची भूमिका प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीनं केली आहे. सिर्फ एक बंदा काफी है असे त्या चित्रपटाचे नाव असून सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT